बेकायदा तलवारी बाळगळ्याप्रकरणी दोघांना अटक

0

जत : जत शहरातील मंगळवेढा रोडवर बेकायदा धारदार तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोघांना जत पोलीसांनी ताब्यात घेतले.दादासाहेब तानाजी खरात वय २२,सचिन दत्तात्रय पडोळकर (वय २२, दोघे रा.कुणीकोणूर,ता.जत) यांना ३०,हजार ३०० रूपयांच्या चार तलवारीसह त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

अधिक माहिती अशी,रविवार ता.९ रोजी सायकांळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संशयित दोघे जत ते मंगळवेढा कडे जाणाऱ्या रोडवरील बनाळी गावाचे हद्दीत सावंत फाटा येथील रोडवर विनापरवाना,बेकायदेशीरपणे चार धारदार तलवारी आपले कब्जात बाळगून मोटार सायकल वरून घेवून जात असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तलवारी व मोटारसायकल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

 

Rate Card

जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली,अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील,डिवायएसपी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रामाघरे यांच्या पथकांने हि कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.