बकासूर व महिब्या बैलजोडीने ‘थार’ जीपवर नाव कोरत इतिहास रचला | वाचा सविस्तर वृत्त

0
विटा : देशातील प्रथमच झालेल्या सर्वात मोठ्या रविवारी ता.९ रोजी भाळवणी (ता. खानापूर, जि. सांगली)येथे रोजी’रुस्तुम ए हिंद’ बैलगाडी शर्यतीचा थरार लाखो शौकिनांनी याची डोळा अनुभवला.या शर्यतीत बकासूर व महिब्या या बैलजोडीने रुस्तुम ए हिंद किताबावर नाव कोरत ‘थार’ जीप जिंकत इतिहास लिहला.प्रथम क्रंमाकासाठी उत्कंठावर्धक झालेल्या शर्यतीत ७ बैलजोड्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. त्यात
2.द्वितीय क्रमांक जीवन आप्पा देडगे नांदेड सिटी, बबनदादा ल्हासुर्णे यांचा ‘रोमन’ आणि अधिक पैलवान कळंबी, सुमितशेठ भाडळे यांचा ‘शंभु’ बैलजोडीने मिळवला.
3.तृतीय क्रमांक आई गावदेवी प्रसन्न, गुड्डी रतन म्हात्रे सांगाव डोंबिवली यांचा घरचा साज ‘मॅगी’ आणि ‘वजीर’ ने या बैलजोडीने मिळविला.
4.चतुर्थ क्रमांक हॉटेल निसर्ग गार्डन, सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहिंदकेसरी ‘सुंदर’ आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा आदत किंग ‘सुंदर’ याने मिळवला.
5.पाचवा क्रमांक नियती भीमराव बुधकर रामूसवाडी करांचा ‘सूर्या’ आणि राहुलशेठ चौधरी वारजे पुणे करांचा ‘रायबान यांनी मिळवला.
6.सहावा क्रमांक गोट्याभाई तडसर, दीपक शेठ चिरले, राहुलभाई पाटील यांचा ‘तेजा’ आणि आदईकरांचा ‘बिरज्या’ यांनी मिळवला.
7.सातवा क्रमांक जावेद मुल्ला तांबवे कराड यांचा ‘सर्जा’ आणि पाली करांचा ‘रणवीर’यांनी मिळवत या‌ ऐतिहासिक देशातील सर्वात मोठ्या शर्यतीत नाव कोरले.

शिवप्रताप मल्टिस्टेटचा १०० कोटीचा व्यवसाय 

भाळवणी (ता. खानापूर) येथे आज रविवार सुटीमुळे सकाळपासून बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी मैदान बैलगाडी शौकिनानी भरले होते.रोजी’रुस्तुम ए हिंद’ बैलगाडी शर्यतीचा थरार आणि कोणती जोडी ‘थार’ जीप पटकावणार याकडे सर्वांचे डोळे लागले होते.रविवार सकाळपासून शौकिनांची उपस्थिती वाढत होती. दुपारच्या रणरणत्या उन्हातही शर्यती बघण्याचा आनंद व उत्सुकता प्रत्येक शौकिनांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.भाळवणीतील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील युथच्यावतीने या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी राज्यासह परराज्यातून शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.
Rate Card
शर्यतीला जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती होती.या स्पर्धेत 27 गटात शर्यती घेण्यात आल्या.त्यातून उपांत्य सामन्यासाठी 32 बैलजोड्या पात्र झाल्या होत्या.या ३२ बैलजोड्यातून चिठ्ठी काढून ६ उपांत्य फेरीतील अतिंम बैलगाड्या निश्चित करण्यात आल्या. सायंकाळी उपांत्य फेरी सुरु झाली.रात्री उशिरा सात बैलजोड्यांची अंतिम फेरीतील थरार पहायला मिळाला. स्पर्धेतील प्रथम विजेत्या बैलगाडी मालकास थार’ जीप बक्षिस,दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकास ट्रॅक्टर,चौथ्या व पाचव्या दुचाकी, सहाव्या क्रमांकासाठी ई बाईक दिली.
तसेच इतरही अनेक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. सहभागीं गाडी चालकांना मानाची गदा व गुलाल दिला.स्पर्धेसाठी खासदार संजय पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील,माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार अनिल बाबर, अरुणअण्णा लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार सदाशिवराव पाटील,

आमदाराची आई,तरीही ८० वर्षांच्या अम्मा जोरगेवार विकतात टोपल्या

मुख्यमंत्री यांचे विशेषाधिकारी मंगेश चिवटे, युवा नेते प्रभाकर पाटील,रोहित पाटील, वैभव पाटील, पै.इत्ता गायकवाड आदीसह कुस्ती व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या सर्वाचे स्वागत डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले.तूफान प्रतिसाद लाभलेल्या‌ या बैलगाड्या शर्यती उत्साहात संपन्न झाल्या.

हेही वाचा..

• हुश्श..$$ वाचलो बुवा | खवळलेल्या जनावरापासून सावधाव..! व्हि’डि’ओ

• व्वा रे, पट्ट्या | महादेवाला नवस बोलताना अशी आरोळी कधी ऐकला का | व्हिडिओ

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.