सांगलीत घरजागेच्या वादातून महिलेचा निर्घून खून

0
घरजागेच्या वादातून मुळ बाज(ता.जत)येथील असलेल्या एका महिलेवर धारदार शस्ञाने हल्ला करून निर्घून खून केल्याची घटना आज‌ ता.९ रोजी दुपारी सांगली शहरातील वानलेसवाडी येथील गल्ली क्रमांक आठमधील हायस्कूल रोड परिसरात घडली आहे.संगीता राजाराम मासाळ (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे.

धक्कादायक | चुलत दिराने आईसह दोन चिमुकल्यांचा खून करून जाळले 

घरजागेच्या वादातून भावकीतीलच तीन तरूणांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.संगीता यांच्या पतीचे काही वषापूर्वी निधन झाले आहे.मासाळ कुटुंब मूळचे जत तालुक्यातील बाज येथील आहे.सांगलीत वानलेसवाडी येथे त्या गेल्या अनेक वर्षापासून स्थायिक आहेत.
संगीता यांच्या भावकीतीलच काही लोक वानलेसवाडी येथे त्यांच्या घराजवळ राहण्यास आहेत. वानलेसवाडी येथील जागेवरून त्यांचा भावकीतील काही लोकांशी वाद सुरू होता.
रविवारी दुपारी संगीता यांचा मुलगा किरण जेवण करून घराबाहेर गेला होता.संगीता जेवण करत असताना हल्लेखोरांनी कोयत्यासह अन्य धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. संगीता यांच्या मान, डोके, चेहऱ्यावर गंभीर वार झाले. त्या थारोळ्यात रक्ताच्या पडल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पलायन केले.
संगिता यांच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला आहे.याप्रकरणी विश्रामबाग पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.विश्रामबाग पोलीसाकडून हल्लेखोराचा शोध सुरू आहे.

• मोबाइल, टिव्हिमुळे संवाद हरविला | या गावांनी घेतला निर्णय आणि बनली ‌ती चळवळ

Rate Card

• म्हैसाळ योजनेचे पाणी जत पूर्व भागात खळखळू लागले

• जतेत अवकाळीचे ढग; वादळाच्या तडाख्याची पुढील इतके दिवस शक्यता

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.