बाजार समिती निवडणूक : जत भाजपकडून मोर्चेबांधणी,बैठकांना वेग | संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला पांठिबा

0
जत : सांगली जिल्हा मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी अद्याप कोणतेही स्वतंत्र पॅनल झाले नाही. युती कोणाबद्दल होईल
याचाही निर्णय अद्याप झाला नाही.इच्छुकांची संख्या भरपूर आहे.शिवाय जत, कवटेमहाकांळ, मिरज हे तीन तालुक्यातील मतदार आहेत. तरीही जत तालुक्यासाठी जास्तीत जास्त जागा मागण्यासाठी प्रयत्न करू या. निवडणुकीसाठी तिन्ही तालुक्यातील ओळखीचा चेहरा उपयुक्त ठरेल.
मार्केट कमिटी सक्षम करणे गरजेचे असून शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देणाऱ्या विचारांचे पॅनेल असणार आहे. असे प्रतिपादन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले,सांगली मार्केट कमिटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथील राजमाता जिजाऊ सभागृहात तालुक्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची व
इच्छुक उमेदवारांच्या आयोजित बैठकीत माजी आमदार जगताप बोलत होते.

 

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद
सावंत, शहराध्यक्ष आण्णा भिसे, भाजप महिला आघाडीच्या तेजस्विनी दहणमाने, माजी तालुकाध्यक्ष सुनील पवार, भाजप
युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप मासाळ, तम्मनगौडा रवीपाटील, बाजचे सरपंच राजेंद्र गडदे,रणधीर कदम, संजय तेली, शंकर बगरे, विठ्ठल निकम, सोमान्ना हाक्के, संतोष मोटे प्रकाश मोटे, गौतम ऐवाळे, माजी सरपंच लक्ष्मण बोराडे, उपसरपंच सचिन बोराडे, किशोर बुरुटे,आप्पासाहेब मासाळ,संजय गडदे, मिलिंद पाटील,आबासाहेब सावंत, समाधान जगताप, रामण्णा जिवण्णावर,
Rate Card
शिवाप्पा तावशी आप्पासी नामद,कुंडलिक पाटील, नागेश सोनूर,राजू पुजारी,आप्पासो थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पवार म्हणाले की,विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील सर्वच निवडणुकीत भाजपाची विजयी घौडदौड चालू आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीची निवडणूक सुद्धा ताकतीने
लढूया,सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन यावेळी पवार यांनी केले.यावेळी वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले.
संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला पाठिंबा
आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय कालखंडात आमदार जगताप यांनी दुसऱ्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती निवडणुकीत असावी असा मुद्दा सुनील पवार यांनी मांडला.याबाबत माजी आमदारांनी आपल्या मनोगतात जागा मुळातच कमी आहेत. मात्र आपला सर्वांचा पाठींबा पाहिजे असे विचारताच उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत हात उंचावून संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.