बाजार समिती निवडणूक : जत कॉग्रेसची बैठक
जत : जत तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२३- २०२८ चे संदर्भात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली.आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
जत तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीतील इच्छुक उमेदवार यांच्याशी संवाद साधून आमदार विक्रमसिंह सावंत, यांनी पक्षाचे रणनीती ठरवावी असे ठरले.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भूतकाळात काय घडामोडी झाल्या हे विसरून पुढील वाटचालीसाठी सज्ज होण्याचें संदेश दिले.या निवडणूकीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सर्वानुमते आमदार विक्रमसिंह सावंत यांना देण्यात आले.