संजय घोडावत पॉलिटेक्निकची उच्चांकी निकालाची परंपरा कायम

0
जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२२ मध्ये संजय घोडावत पॉलिटेक्निकने आपली निकालाची उच्चांकीत परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेमध्ये  विविध विभागातील मिळून एकूण १४  विद्यार्थ्यांनी ९०% हुन अधिक गुण मिळवून उच्चंकित यश संपादन केले आहे.
यासोबतच विविध विभागातून  वेगवेगळ्या  विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत १००  पैकी १०० गुण मिळवून विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा  मान याहीवर्षी पटकाविला आहे.  त्यामध्ये इलेक्ट्रिकल विभागातून कु. शुभदा रेडेकर विषय: इंडस्ट्रियल एसी मशीन आणि स्विचगिअर अँड  प्रोटेक्शन व कु. गौरी पाटील विषय: स्विचगिअर आणि प्रोटेक्शन यासोबत प्रथम वर्षातून कु. अनन्या मोरती, श्री. ऋषिकेश पोतदार, कु. निकिता पाटील यांनी बेसिक मॅथेमॅटिक्स या विषयात १०० पैकी १००  गुण संपादित केले आहेत.
तृतीय वर्षातील विविध विभागातून कु. शुभदा  रेडेकर ९५.४० % गुण मिळवून तंत्रनिकेतन मध्ये प्रथम क्रमांक, कु. गौरी पाटील ९५.२० % मिळून तंत्रनिकेतन मध्ये द्वितीय व कु. साक्षी सुडके ९२.०० % गुण मिळून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
Rate Card
द्वितीय वर्षातील विविध विभागातून  आर्य कोळेकर ९४.२२% प्रथम क्रमांक,  श्रीवर्धन पाटील ९१.६५ % द्वितीय क्रमांक व अमन बागवान ९०.७८% तृतीय क्रमांक मिळविला आहे.
प्रथम वर्षातून कु. कविता पुजारी ९२.४३ % प्रथम क्रमांक, कु. मानसी गवळी ९२.००% द्वितीय क्रमांक आणि कु अनन्या मोरती ९१.४६ % तृतीय क्रमांक मिळवलेले आहेत.
या निकालाबद्दल प्राचार्य, श्री. विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यापुढे उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी अशा व्यक्त करून या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना  देऊन पालकांचे मनापासून कौतुक केले आहे.  घोडावत विद्यापीठाचे  अध्यक्ष  श्री. संजयजी घोडावत आणि विश्वस्त श्री. विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.