SSC-HSC Results : तारखा जाहीर झाल्या ,१० वी,१२ वीचा निकाल या तारखेला लागणार | जाणून घ्या

0

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशाचे पहिले पाऊल असलेल्या १० आणि १२ वी परीक्षेकडे विद्यार्थ्यासह त्यांच्या पालकांचे निकालाकडे डोळे लागले आहेत.या निकालाचे आता  तारखाची घोषणा करण्यात करण्यात आली आहे.दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.येत्या 10 जूनपर्यंत बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

स्वस्तात मरणाची ‘झिंग’ गल्लोगल्ली पोहचली | लहानगे,प्रौढही आहारी,ग्रामीण भागात धुमाकूळ

तर २० जूनपर्यंत दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सोमवारी याबाबत माहिती उपलब्ध झाली आहे.१० आणि १२ परिक्षेचा निकाल दरवर्षी मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात जाहीर केला जात असतो.

साठेखत नेमका काय आहे प्रकार ?,कसा मिळतो मालकीहक्क वाचा सविस्तर

नुकत्याच झालेल्या यंदाच्या १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. सध्या निकाल तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थी त्यांच्या पालकांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.दरम्यान निकालाच्या तारखा जाहीर झाल्यामुळे त्याकडे आता लक्ष लागले आहे.

महापुरूषांचे आचार-विचार समाजासाठी प्रेरक – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

जिवघेण्या कोरोनाचा वेग ओसारल्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली आहे.त्यामुळे सरकारने सर्व निर्बंध शिथील केले. त्यानंतर शाळा आणि कॉलेज सुरु करण्यात आली.दरम्यान, कोरोना महामारीनंतर यंदा १० वी व १२ वी परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.  यंदाची दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली होती.

विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हैशीही दगावल्या | पहा ‌कुठे घडली घटना

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जास्त वेळ देखील देण्यात आला होता. याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला.त्यामुळे १० वी व १२ वी परिक्षा दिलेल्या मुलांचे गुण वाढण्यासही मदत होणार आहे.शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकत आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे निकाल लांबणार असे म्हटले जात होते.पंरतू पेपर तपासणीचे काम निकाल वेळेत झाल्यामुळे निकालही वेळेतचं लागणार हे स्पष्ट झाले आहे.

संजय घोडावत पॉलिटेक्निकची उच्चांकी निकालाची परंपरा कायम

 

Rate Card

१० निकालासाठी येथे क्लिक करा : लिंक १

१० वी निकाल पाहण्यासाठी लिंक २

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.