विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हैशीही दगावल्या | पहा ‌कुठे घडली घटना

0
शुक्रवारी सायकांळी आलेल्या वादळी पावसात विजपडून वयोवृद्ध शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर २ म्हैशीही दगावल्या आहेत.
दरिबडची (ता.जत) येथे विज कोसळून एका वयोवृद्ध शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर दोन म्हैशीही विजेच्या धक्यात मृत्त झाल्या आहेत.जत तालुक्यात गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण आहे.काही भागात विजेच्या कडकडाटासह अवकाळीने हजेरी लावली आहे.
शुक्रवारी तालुक्यातील अनेक गावात अवकाळीचा तडाखा बसला.
दरिबडची येथील वयोवृद्ध शेतकरी संगाप्पा संनाप्पा पुजारी (वय ७०)हे २ म्हैशी घेऊन चरवण्यासाठी गावापासून काही अंतरावरील माळरानावर गेले होते.सायकांळी साडेचारच्या दरम्यान ढगाळ वातावरण बघून ते म्हैशी घेऊन घरी परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबतच्या दोन म्हैशीही दगावल्या आहेत.विज पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.दरम्यान संगाप्पा पुजारी यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुले,सुना नातवडे,परतवंडे आहेत.दरम्यान शुक्रवारी जत पश्चिम भागासह अनेक गावात अवकाळीचा पाऊस झाला,काही ठिकाणी गारांचाही शिडकावा झाला आहे.

 

हेही वाचा

• धक्कादायक | चुलत दिराने आईसह दोन चिमुकल्यांचा खून करून जाळले

Rate Card

• जत‌ तालुक्यातील या गावात भरले तिसरे कन्नड साहित्य संमेलन

• डफळापूरात अवकाळीने नुकसानग्रस्त बागेची पालकमंञ्यांनी केली पाहणी | काय म्हणाले पालकमंत्री(व्हिडिओ)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.