रात्री झोपताना मोबाईल दुर ठेवणे हिताचे !
अलिकडच्या काळात मोबाईल शिवाय माणसाचे जगणे असह्य होऊन गेले आहे.मोबाईलशिवाय त्याला करमतच नाही.अशी अवस्था झाली आहे.मोबाईलच्या बाहेर सुद्धा जग आहे हे तो विसरून गेला आहे.अति तिथे माती याप्रमाणेच सोशल मिडीयाचे झाले आहे.आपण मोबाईलच्या ईतक्या आहारी गेलो आहोत की अक्षरशा वेडे पिसे करून टाकले आहे.
बर्याचदा रात्री झोपण्यापूर्वी लोक मोबाईल चेक करत असतात .किंवा एखादा फोन अर्जंट येईल यामुळेसुद्धा काहीजण मोबाईल उशीजवळ ठेवतात .तर ही सवय हानिकारक आहे .कारण सतत मोबाईल जवळ ठेवल्याने मोबाईल मधुन रेडिओ फ्रिक्वेन्सी निघत असतात.ज्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे.फोनमधून येणार्या लहरींमुळे मेंदूवर परिणाम होतो.अल्झामर सारखे विकार होतात.कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
अनिद्रा व मानसिक आजार बळावतात.ताणतणाव वाढतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या २०११च्या संशोधनात मोबाईल उशीखाली ठेवून झोपल्याने अडथळा निर्माण होऊ शकतो.मोबाईलच्या ब्लू लाईटमुळे डोळ्याला त्रास होतो.झोपेमध्ये व्यत्यय येतो.ज्यांना मोबाईल जवळ ठेवून झोपण्याची सवय आहे त्यांनी डाटा प्लॅन बंद करुन झोपावे.किंवा तीन चार फुट अंतरावर मोबाईल
ठेवावा.
आज मोबाईल वापरणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण खबरदारी घेताना कोणी दिसत नाही.अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.होता येईल तितका मोबाईल दुर ठेवणे फायदेशीर आहे.शेवटी आपले आरोग्यहीत महत्वाचे आहे.त्यासाठी रात्री झोपताना मोबाईल दुर ठेवणे हिताचे आहे.

संतोष दत्तू शिंदे,
मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा , जिल्हा.अहमदनगर(महाराष्ट्र)
मो.७७२१०४५८४५
• साठेखत नेमका काय आहे प्रकार ?,कसा मिळतो मालकीहक्क वाचा सविस्तर