जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची संखला भेट

0
जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी गुरूवारी संख अपरला भेट देत परिसरातील नागरिकांच्या अडचणी,मंडल अधिकारी,तलाठी,महसूल कार्यालयातील समस्या जाणून घेतल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.दयानिधी यांनी ग्रामपंचायत ‌कार्यालयाला भेट दिली.
उपसरंपच सुभाष पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी अपर तहसीलदार सुदाकर मागाडे,ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ.दयानिधी यांना निवेदने दिली.गावात स्मशानभूमी व्हावी,त्याचबरोबर मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे,पंरतू येथे एमबीबीएस डॉक्टर नाही,रुग्णांना सुविधा मिळत नाहीत,चांगला डॉक्टर मिळावा,सुविधा मिळाव्यात,असे निवेदन युवा सेनेचे तालुकाध्यक्ष प्रविण अवरादी,विठ्ठल कुंभार यांनी निवेदन दिले.
दरम्यान स्मशानभूमीसाठी गावात करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन प्रस्ताव दाखल करावेत,त्याच बरोबर कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर देण्यासंदर्भात संबंधित विभागाला सुचना देतो,असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी संख ग्रामपंचायतीला भेट दिली,त्यावेळी त्यांचा सत्कार उपसरपंच सुभाष पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी अपर तहसीलदार सुदाकर मागाडे,ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.