उटगीत जिल्हा बँकेचे एटीएम बसवू – प्रकाशराव ‌जमदाडे

0
माडग्याळ : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली उटगी व सोन्याळ शाखेचा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यानिमित्त बँक सुरू झाली त्यादिवशी प्रथम खातेदार,ठेवीदार,नियमित कर्ज भरणारे सभासद व बचत गट यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.बँकेच्या कामकाज व कर्मचारी यांचे व कामकाजाबाबत खातेदारांनी समाधान व्यक्त केले वर्धापन हे निमित्त आहे,यामुळे सभासदाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी दिली.
बँकेच्या असणाऱ्या सर्व योजनची माहिती दिली ,सभासदांना लाभांश देणारी उटगी एकमेव सोसायटी आहे.कर्ज घेऊन वेळेत परतफेड करण्याची विनंती केली सभासदांनी एटीएम मागणी केली असून येत्या काळात पूर्ण करणेची ग्वाही जमदाडे यांनी दिली यावेळी बसवराज बिराजदार,एम.एस.पाटील सर,चंदू पवार,भारत मोरे,बसवराज तेली ,महदेव अंकलगी,विजय बगली,चिदानंद तेली,मल्लू आवटी ,बँकेचे अधिकारी,कर्मचारी ,चेअरमन व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अबब..पारा 39 अंश पार,उन्हाच्या झळा असह्य
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.