बाजार समितीतील भ्रष्ट कारभार रोकण्यासाठी बळीराजा पँनेलच्या उमेदवारांना विजयी करा | – महादेव हिंगमिरे

0
जत : सांगली बाजार समिती निवडणूक लढविण्यासाठी केवळ संचालक होणे एवढाच मर्यादित विचार नाही. तर ज्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे डाळिंब, द्राक्ष या फळ पिकांबरोबर प्रसिध्द हळद व इतर शेतीमालाच्या विक्रीसाठी योग्य न्याय मिळत नाही. सावळी व उमदी येथील जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे लेखापरीक्षणात सापडले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास अडचणी आहेत.या अवस्थेतून बाजार समितीला बाहेर काढून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बळीराजा शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ग्रामपंचायत गटाचे उमेदवार तथा पॅनेलप्रमुख महादेव हिंगमिरे यांनी केले.
जत शहरातील गांधी चौक येथील मारुती मंदिरात सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बळीराजा शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलच्या शुभारंभ प्रसंगी हिंगमिरे बोलत होते.यावेळी बळीराजा संघटनेचे रास्ते,रासपचे जिल्हाध्यक्ष आपासाहेब थोरात,वाळेखिंडीच्या सरपंच वसुधाताई हिंगमिरे,रासपचे तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे, माडग्याळ विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर, व्हाईस चेअरमन लिंगाप्पा कोरे ,गुड्डापूर विकास सोसायटी चेअरमन धानाप्पा पुजारी, नागेश ऐवळे,अंबाना माळी,श्रीमंत कोरे,प्रभाकर चौगुले,शिवानंद हाक्के,होनाप्पा माळी, सुब्राय बिराजदार, बंडू बिराजदार,रामा सूर्यवंशी, अखिलेश नगारजी, किसन टेंगले, श्रावण मोटे, रामचंद्र मदने संभाजी टेंगले, पिंटू मळगे, अमोल कुलाळ ,आप्पासो थोरात आदी उपस्थित होते.
Rate Card
यावेळी पॅनेलप्रमुख महादेव हिंगमिरे व रासपचे तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे म्हणाले की,जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डाळींब, द्राक्ष पिकांचे उत्पादन घेतले जाते.फळपिकांची व इतर शेतीमलाची  विक्री व्यवस्था योग्य पद्धतीने करणे,बेदाण्याची उधळण थांबवून त्याचे पेमेंट २१ दिवसात मिळालं पाहिजे.बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याबरोबरच तूट २५० ग्रॅम धरली पाहिजे.यासाठी प्रयत्न करू.  रेल्वेच्या माध्यमातून  देशभर शेतकऱ्यांचा शेतीमाल पाठवला जातोय पण त्याचीही व्यवस्था योग्य पद्धतीने होत नाही.त्यासाठी आमचे पॅनल प्रयत्नशील राहील.
याप्रसंगी सांगली बाजार समितीचे उमेदवार भाग्यवंत तुकाराम कुलाळ ,महादेव शंकर हिंगमिरे. संभाजी टेंगले,दादासाहेब नरळे ,बंडु  डोंबाळे,अकिल नगारजी, निंगाप्पा  कोरे,मंगल महादेव पारेकर,किसन टेंगले ,राहुल  घेरडे ,संजय चव्हान, कुमार बनसोडे हे उमेदवार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.