फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये राज्यस्तरीय टेक्नोफॅब २ के २३ स्पर्धा उत्साहात
सांगोला :- फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड रिसर्च मध्ये टेक्नोफॅब २ के २३ या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन २१ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले होते . या स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे , सोलापूर विभागीय विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.आर.पी.काटे यांच्या हस्ते करण्यात आले.टेक्नोफॅब २ के २३ चे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांची देवाणघेवाण करणे, त्यांचे कार्य प्रदर्शित करणे आणि विविध क्षेत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञान शोधणे हे आहे. असे मत कॉम्पुटर सायन्स विभाग प्रमुख डॉ सोमनाथ ठिगळे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, ऑटो कॅड, मिस्टर लेथ, इलेक्ट्रिक सुडोकू,कोडींग हंट, ब्लाइंड सी, इत्यादींचा समावेश होता.
डॉ.आर.पी.काटे यांनी सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याबरोबर आपण आपले ज्ञान वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे,शैक्षणिक पदवी बरोबर तांत्रिक कौशल्य आत्मसात करावीत. असे मत व्यक्त केले .राज्यातील सुमारे १७ महाविद्यालयातून १३११ हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. शरद पवार, प्रा. टी एन जगताप ,प्रा.डॉ.तानाजी धायगुडे यांनी केले .या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.राहुल पाटील , सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप प्रा. प्रियांका पावसकर यांनी केले.
