परिवर्तन पँनेलच्या उमेदवारांना विजयी करा |- आ.महादेव जानकर

0
2
डफळापूर : सांगली मार्केट कमिटी निवडणुकीत बळीराजा शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलमधील उमेदवार शेतकऱ्यांची मुले आहेत.मार्केट कमिटीतील हळदीची बाजारपेठ देशभर प्रसिद्ध आहे.याच हळदीला चांगल्या पद्धतीने आयात निर्यात करून शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याबरोबरच इतर शेतमालालाही योग्य भाव दिला जाईल.इतरही अनेक संघटनांबरोबर पॅनेलला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे.त्यामुळे निवडणुकीत यश नक्की मिळणार असून सभासदांनी मतदान करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी जत येथे केले.

कुणीकोणूर खूनप्रकरणी संशयितास ३ दिवसाची पोलीस कोठडी

सांगली मार्केट कमिटी निवडणुकीत बळीराजा शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलच्या प्रचारासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. महादेव जानकर  तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. तालुक्यातील त्यांनी अनेक ठिकाणी मतदारांशी संपर्क व काही प्रमुख गावात प्रचार केला.त्यानंतर त्यांनी  जत येथे आयोजित पत्रकार परिषदेत वरील प्रतिपादन केले. पत्रकार परिषदेला  बळीराजा संघटनेचे बाळासाहेब रास्ते,रासपचे जिल्हाध्यक्ष आपासाहेब थोरात व सर्व पदाधिकारी, सांगली मार्केट कमिटीच्या बळीराजा शेतकरी विकास परिवर्तन पॅनल प्रमुख महादेव हिंगमिरे रासपचे तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे,अखिलेश नगारजी,भूषण काळगी, किसन टेंगले, श्रावण मोटे, रामचंद्र मदने, संभाजी टेंगले, पिंटू मळगे, अमोल कुलाळ,ओंकार बंडगर, लक्ष्मण पुजारी  व बाजार समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

 पुढच्या ३ वर्षात एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही |- जयंत पाटील | वसंतदादा शेतकरी विकास पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन

आमदार जानकर म्हणाले की,निवडणुकीत मतदारांनी  मत विकू नये.काँग्रेस ,राष्ट्रवादी व भाजप हे मोठे पक्ष आहेत.मतदारांना पैसे वाटण्याचे काम सुरू आहे.हे चुकीचे असून मतदारांनी मत विकू नये असे आवाहन त्यांनी केले.काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपमधील काही अदृष्य मते आमच्या पॅनेलला मिळणार आहेत.आमचे सर्व उमेदवार विजयी होतील. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. भाजप बरोबर आमची युती असून त्यांनी सन्मानपूर्वक जागावाटप केल्या तर युती करू अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ५२४ लोकसभेच्या जागा रासप स्वबळावर लढणार आहे. तसेच मी स्वतः माढा, बारामती, परभणी,उत्तर प्रदेश राज्यातील मिर्जापुर यापैकी एका मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहे.
माझे जतवर प्रेम पण जतने मला फळ दिल नाही-माजी मंत्री महादेव जानकर
जतवर माझे खूप प्रेम आहे.जत हे माझे  माहेर घर आहे .मात्र या तालुक्यात मी केवळ कष्ट व संघर्ष केला.पण तालुक्याने मला काही फळ दिले नाही.इतरांना आठ दिवसात आमदार केले,आम्हाला अद्याप पर्यंत काहीही दिले नसल्याची खंत महादेव जानकर यांनी बोलून दाखवली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here