मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा,कंटनेरची दांपत्याला धडक | पती ठार, पत्नी गंभीर

0
जत शहरातील महामार्ग दिवसेन् दिवस धोकादायक ठरत आहेत.महामार्गावर कोठेही फलक लावले नसून जत शहरातील दुभाजकाचा प्रश्न अद्याप सोडविला नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर अर्धवट कामे आहेत त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.गुरूवार ता.२७ ला पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या दांपत्याला भरधाव कंटेनरने धडक दिली.त्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.शहरातील डॉ.तांबोळी यांच्या हॉस्पिटलसमोर हा भीषण अपघात झाला आहे. सतीश गेनाप्पा शिंदे,(वय ३२, रा.सातारा रोड, जत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची पत्नीलाही गंभीर जखमी झाली आहे.

कुणीकोणूर खूनप्रकरणी संशयितास ३ दिवसाची पोलीस कोठडी

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,जत शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गाने शहरातील अनेक नागरिक शतपावली करण्यासाठी पहाटे मॉर्निंग वाक करतात. रस्त्याची अद्यापही अर्धवट कामे असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत.वाहने अत्यंत बेदरकार व भरधावपणे चालविली जातात. त्यामुळे अनेकांचा बळी गेला आहे.गुरुवार सकाळी साडेपाचच्या सुमारास सतीश शिंदे व त्याची पत्नी हे विजापूर रोड वरून मॉर्निंग वॉकसाठी गेले होते‌,घरी परत येत असताना या दांपत्याला विजापूर कडून साताऱ्याकडे निघालेल्या भरघाव कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली.
धक्कादायक म्हणजे कंटेरनरने दोघांना रस्त्यावरून अनेक फूट फरपटत पुढे नेले.त्यात सतीशचा जागीच मृत्यू झाला.तर त्याची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे.घटनास्थळी नागरिकांनी धाव घेवून जखमींना मदत केली.सतीश हा सातारा रोड येथे राहतो.शरद पवार हॉस्पिटलच्या समोर त्यांचे आशीर्वाद ड्रायक्लीनर्स नावाचे इस्त्री व ड्रायक्लीनचे दुकान आहे.
अत्यंत कष्टाळू,मनमिळावू असलेल्या सतीशचा अशा अपघाती मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.पोलीसांनी पार्थिवाचे शवविच्छेदन करून मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.गुरुवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.