दुचाकी चोरटा जेरबंद,पाच मोटारसायकली जप्त,जत पोलीसांची कारवाई

0

जत,संकेत टाइम्स : जत शहरासह तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या मोटरसायकल चोरट्यास जत पोलीसांनी पकडत 4 लाख 50 हजाराच्या पाच मोटारसायकली त्यांच्याकडून जप्त केल्या.याप्रकरणी विशाल बाळू बामणे (वय-23 रा.विठ्ठलनगर,जत) यांच्यावर गुन्हा दाखल अटक केली आहे.

जत शहरासह तालुक्यात बुलेट,स्पेल्डर,महिंद्रा चँम्पीयन सारख्या महागड्या दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

त्यापार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम,अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले,डिवायएसपी रत्नाकर नवले यांनी शहरासह‌ तालुक्यात पेट्रोलिंग करून संशयिताच शोध घेण्याचे आदेश दिले होती.

त्यानुसार जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रविण पाटील,केरबा चव्हाण,सतिश माने,संतोष कुंभार हे पेट्रोलिंग करत असताना शेगाव चौक येथे संशयित बाळू बामणे हा संशयास्पद रित्या फिरत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास‌ आले.त्यांनी त्याला हटकत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने पाच मोटारसायकली चोरल्याचे व आजही मोटर सायकल चोरण्यासाठी फिरत असल्याचे पोलीसांना सांगितले.

त्यावरून त्याला ताब्यात घेत त्यांच्याकडील बुलेट 2,एच एफ डिलक्स,स्प्लेडर,महिंद्रा चँम्पीयन अशा सुमारे 4 लाख 50 हजाराच्या दुचाकी आढळून आल्या.त्यांच्याकडे अन्य काही चोऱ्यांचा तपास लागण्याची शक्यता असून पो.ना.प्रविण पाटील अधिक तपास करत आहेत.

Rate Card


पोलिस निरिक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या पथकांने ही कारवाई केली.दरम्यान जत शहरातील मोटारसायकल चोरट्याला अटक केल्यांचे वृत्त येताच अन्य दुचाकी चोरीला गेलेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात चौकशी करत आपली पण दुचाकी सापडली आहे का यांची चौकशी करत होते.

जत शहरातील दुचाकी, चोरट्यासह,पोलीस पथक

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.