कुणीकोणूरमधिल खूनाचा छडा,भानामती,करणी केल्याचा संशयातून मायलेकीचा गळा आवळला | दोघे संशयित ताब्यात,एक फरार

0
संख : भानामती, करणी,भावकीचा वादातून कुणीकोणूर येथील मायलेकीचा खून केल्याचे स्पष्ट झाले असून आईचा गळा आवळताना मुलीने बघितले म्हणून तिजाही निर्घृनपणे गळा आवळण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे,प्रियंका बिराप्पा बेंळुखे (वय-३२) व मुलगी मोहिनी बिराप्पा बेंळुखे (वय-१४) या मायलेकीच्या खूनाचा छडा लागला आहे.
याप्रकरणी बेळंखी वस्तीवर घडली.अक्षय रामदास बेळुंखे (वय २४),विकास मारुती बेळुंखे (वय २३), यांना अटक करण्यात आली. फरारी बबलू म्हळाप्पा बेळुंखे (वय २३) आहे.पोलिस शोध घेत आहेत.संशयित दोघा आरोपींना जत न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अगदी शांत डोक्याने केलेल्या या दुहेरी खूनाचा सा.पो.निरिक्षक पंकज पवार यांच्या पथकांने कसून तपास करत छडा लावला आहे.रविवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ही घटना घडली होती.ही घटना रविवारी सायंकाळी रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली होती.
Rate Card
कुणीकोणूर-सनमडी रस्त्यालगत बेळंखी वस्तीवर पति बिराप्पा कुटुंबासह रहातात.पत्नी प्रियंका,मुलगी मोहिनी,अन्य दोन मुले आहेत.बिराप्पाचे भावकीबरोबर वाद होता.संशयित अक्षयाचा मोठा भाऊ माजी सैनिक विजयकुमार बेळुंखे यांचा एका महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता.त्याबरोबर त्यांचे पूर्ववैमनस्य होते.
बिराप्पाची पत्नी प्रियंका ही भानामती,चेटणी, करणी करते असा संशय भाविकीतील लोकांना होता.विजयकुमार बेळुंखे यांचा मृत्युही त्यामुळे झाला असल्याची संशय होता.रविवारी सायंकाळी पाच वाजता घरी कोणीही नव्हते.अक्षय बेळुंखे ,विकास बेळुंखे,बबलू बेळुंखे हे घरी गेले. प्रियंकाला पाणी मागितले.प्रियंका पाणी आणायला घरामध्ये गेल्यावर दोघांनी तिला पकडले,तिसऱ्यांने तिचा गळा आवळून खून केला.आईचा मृतदेह आरोपी आईचा मृतदेह छप्परात टाकताना मोहिनीने बघतिला.ती आरडोआरडो करु लागली.ति बाहेर वाचता करेल.
या भितीने मुलगी मोहिनी हिचाही गळा दाबून खून केला.तिघे फरार झाले. सांगोल्याला दुचाकी गाडीवरुन गेले.सांगोल्यातून रेल्वेने दिल्लीला गेले.संशयित म्हणून अक्षयला ताब्यात घेतले होते.परंतु गुन्हा कबूल न केल्यामुळे सोडले होते.आज सकाळी विकास सापडल्याने गुन्हा उघडकीस आला.पोलिस फरार बबलू याचा शोध घेत आहेत.
दरम्यान,पति पत्नी वारंवार खटके उडत होते.हा खून त्याच्यावर येईल.यामुळे खून करुन आरोपी फसार झाले होते.घटना संशयास्पद असल्याने रात्री १० वाजता माहिती पोलीस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलीस ठाण्याला दिली होती.मयत प्रियंकाचा भाऊ संतोष रामा चौगुले (वय १९,रा खैराव ता.जत) यांनी फिर्याद दिली होती,त्यानुसार बिराप्पा बेळुंखेला अटक केली होती.मुलगी मोहिनी ही गावातील हुडेबाबा हायस्कूलमध्ये इयत्ता सातवी वर्गात शिकत आहे.पत्नी प्रियंका,मुलगी मोहिनी हिचा खून झाला.या दुहेरी खूनामुळे तीन कुटुंब उध्वस्त झाले आहेत.
चुकीच्या फोन कॉलच्या गैरसमजूतीतून 7 जणांना मारहाण केल्याप्रकरणी 7 जणावर गुन्हा दाखल
सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस फौजदार महेश स्वामी यांना गुप्त माहितीच्या आधारे,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात,पोलीस उपनिरीक्षक एस एस शिंदे,हवालदार संजयकुमार माळी,महेश स्वामी,पोलीस हवालदार आटपाडकर,पोलीस सिध्देश्वर हवालदार नितीन पलूस्कर,पोलीस हवालदार प्रकाश रामागडे,पोलीस शिपाई आप्पा कुंभारे यांनी सापळा रचून संशयित दोघांना अटक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.