जतमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरू

0
जत : जत शहरातील विठ्ठलनगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ चा प्रारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते महाराष्ट्र दिनी करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.ऐश्वर्या माळी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर,आरोग्य अधिकारी डॉ.भारती पाटील,वैद्यकीय अधिक्षक,डॉ तब्बसुम फरास,डॉ.जोस्तना अदाटे,गटविकास अधिकारी अपासाहेब सरगर,तहसीलदार बनसोडे,माजी सभापती परशुराम मोरे, युवानेते कुमार साळे,अरुण साळे,रामदास भोसले,जत सर्कल भारत काळे,कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष कोळी,विठ्ठलनगर भागातील ग्रामस्थ,आरोग्य कर्मचारी, आशासेविका उपस्थित होत्या. राज्यभरात या योजनेंतर्गत असणाऱ्या दवाखान्याचे ई- उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
या दवाखान्यात सर्व उपचार मोफत मिळणार असून, मोफत तपासणी गर्भवती मातांसंदर्भात सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. ही योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेची सुरवात १ मेपासून राज्यभरात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून जत नगरपरिषद जवळील विठ्ठल नगर भागात आरोग्य विभागाच्या जागेत या योजनेंतर्गत दवाखान्याची निर्मिती करण्यात आली. या दवाखान्यामध्ये सर्व उपचार व तपासण्या मोफत केल्या जाणार असून, औषधे मोफत पुरविली जाणार आहेत.
गरोदर मातांची नियमित तपासणी व त्याचबरोबर लसीकरण आदी आरोग्यसेवा पुरविल्या जाणार आहेत. गरीब गरजूंसाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. दुपारी दोनपासून तर रात्री दहापर्यंत हा दवाखाना सुरू असणार आहे. आरोग्य केंद्रामध्ये एक वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), एक आरोग्यसेवक, एक आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, एक शिपाई असे कर्मचारी असणार आहेत. या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी केले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.