चोरी झालेले १२ मोबाइल मुळ मालकांना परत

0
10
जत : जत पोलीस ठाणे हद्दीत चोरी झालेले १ लाख ७५ हजार रूपयाचे किंमतीचे १२ मोबाइल शोधून ते मुळ मालकांना ‌जत पोलीसाकडून सुपुर्द करण्यात आले.

जत पोलीस ठाण्याकडे गहाळ मोबाईलच्या तक्रारी दाखल होत्या.  सायबर पोलिस ठाण्याकडील पोलीस उपनिरिक्षक रोहिदास पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉंस्टेबल कैप्टन गुंडवाडे,करवी यांनी तांत्रिक तपास करून हे मोबाइल शोधून काढले आहेत.

 

मुबारक नदाफ काराजनगी,योगेश्री कुंभार ‌जत,शीतल चव्हाण कवठेमहांकाळ, अनिल शिरगिरे वाषाण,संतोष शिवपुंजी बिळूर,रेवाप्पा पुजारी सोरडी,शंकर कोडग निगडीखुर्द,प्रकाश गडदे बाज,सागर कोळी,किसन हाजारे खलाटी,प्रेम कोळी जत,दिलीप बंडगर मल्याळ यांचे मोबाईल शोधून काढण्यात पोलीसांना यश आले आहे.पो.नि.राजेश रामाघरे यांच्याहस्ते हे मोबाइल देण्यात आले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here