छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन रस्त्याचे लवकरचं डांबरीकरण | दिड कोटीचा निधी मंजूर

0
जत : जत शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन या दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.जत शहरातून जाणाऱ्या चडचण – इस्लामपूर या राष्ट्रीय महामार्गावरील छ. संभाजी महाराज चौक ते पोलीस स्टेशन या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याने जत शहरवासियांची लवकरच धुळीपासून आणि वाहन चालवताना होणाऱ्या कसरतीतून सुटका होणार आहे.जत शहरातून जाणारा चडचण इस्लामपूर हा राष्ट्रीय महामार्ग छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस स्टेशनपर्यंत अत्यंत खराब झाल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी व अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

सांगली जिल्हा वकील संघटनेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी किरण रजपूत 

छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन या रस्त्याचे डांबरीकरणाचे कामासाठी विविध राजकीय व सामाजिक संघटनानी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत.परंतु हा रस्ता कोणाकडे आहे,याचेच आतापर्यंत राजकारण झाले आहे.परिणामी आतापर्यंत या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहीला आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन हा रस्ता खराब झाल्याने व या रस्त्याच्या मध्ये मोठमोठे खड्डे पडून रस्त्यावरील धूळ ही रस्त्यावरून जाणारे येणारे वाहन‌ चालक व नागरिक यांच्या डोळ्यात जात असल्याने त्याचा त्रास वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतेच छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन या एक किलोमीटर अंतराचे डांबरीकरण कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
दिड कोटीचा निधी मंजूर
जत शहरातील या महत्वाच्या रस्त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आहे,रस्त्याच्या कामासाठी दिड कोटीचा निधी मंजूर झाला असून लवकरचं या कामास सुरूवात होईल.यामुळे जतच्या सौदर्यांत भर पडेल.
– आ.विक्रमसिंह सावंत
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.