सर्वव्यापी नेतृत्व असणारे एम.बी.पाटील यांना साथ द्या | – आ.विक्रमसिंह सावंत

0
विजयपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी जलसंपदामंत्री एम.बी.पाटील यांच्या प्रचारार्थ बाबानगर येथे जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी प्रचारसभा घेतली.काँग्रेस हा एक विचाराने चालणारा व राष्ट्रहित जपणारा सर्वसमावेशक पक्ष आहे. माजी मंत्री एम.बी.पाटील साहेबांनी आपल्या कामाच्या जोरावर आधीच इथल्या लोकांची मने जिंकली आहेत.
बबलेश्वर मतदार संघात विकासाभिमुख कामांना त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिला आहे.
त्यांच्या सर्वव्यापी नेतृत्वाला साथ देत बबलेश्वर मतदारसंघातील जनतेने “हात” या चिन्हासमोरील बटन दाबून येत्या 10 तारखेला विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन आ.सावंत यांनी याप्रसंगी केले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराया बिरादार, बाबानगर गावातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.