सांगली जिल्हा वकील संघटनेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी किरण रजपूत
सांगली जिल्हा वकील संघटनेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी किरण रजपूत, उपाध्यक्षपदी विजय गाडेकर व सहसचिवपदी विशाल कुंभार यांची निवड झाली आहे. विजयी उमेदवारांनी न्यायालय आवारात जल्लोष साजरा केला.जिल्हा वकील संघटनेची निवडणुक चुरशीची झाली.निवडणूक समिती म्हणून हरिष प्रताप, सुधीर खाडे, उदय लोखंडे, रविकांत पाटील, मायादेवी पाटील, पुरुषोत्तम बेंद्रे, दीपक कांबळे, सुहास कवठेकर व पल्लवी ओगले यांनी काम पाहिले.
चोरी करताना पाहिल्याने तुंरूगात जावे लागेल म्हणून महिलेची हत्या
कार्यकारणीतील आठ जण यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये सचिवपदी अमोल पाटील, सहसचिव (महिला) पल्लवी कांते, कार्यकारणी सदस्य आमसिद्ध बिराजदार, सतीश पवार, किरण लोंढे, अक्षय राजगे, सुकुमार कोरे, धनश्री जगदाळे बिनविरोध निवडून आले आहेत.या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी किरण रजपूत यांना ३४७ मते मिळाली तर विरोधी सचिन पाटील यांना १५५ मते मिळाली.

अथणीत काट्याची टक्कर | माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदींचे भाजपला ओपन चँलेज
उपाध्यक्षपदासाठी विजय गाडेकर यांना ३७५ मते तर दीपक हजारे यांना १२६ मते मिळाली. सहसचिव पदासाठी विशाल कुंभार यांना ३६१ मते मिळाली तर शिवाजी कांबळे यांना १३८ मते मिळाली.कार्यकारणीतील अन्य सहा जागा रिक्त आहेत एकूण ५४९ सभासद वकीलापैकी ५०३ सभासदांनी मतदान केले.