नादचं करायचा नाय,गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी दोन दिवस रजा द्या | जबरा फँनचे पत्र व्हायरल

0

 

लावणी स्टार, डान्सर प्रसिध्द गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची भुरळ सर्वत्र पसरली आहे.तिच्या अदा बघण्यासाठी तूफान गर्दी होत आहेचं,मात्र आता सर्वावर कहर झाला असून गावात होणाऱ्या गौतमीच्या कार्यक्रमासाठी,गौतमीचा जबरा फँन असलेल्या तासगाव एसटी आगारातील एका बसचालकाने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दोन दिवस रजेची मागणी केली आहे.अगदी गौतमीच्या गावात होणाऱ्या कार्यक्रमाचा थेट उल्लेख रजा अर्जावर केला आहे. हा रजा अर्ज सोशल मीडियावर तूफान चर्चेत झाला आहे.या चालकाची रजेच्या मागणीची चर्चा मात्र सोशल मिडिया सह जिल्हाभर रंगली आहे.

Rate Card
राज्यभरात अनेकवेळा आरोप-पत्यारोप व अनेक कार्यक्रमात राडा होत असूनही गौतमी पाटीलची प्रसिध्दी तिळभरही कमी होत नसल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.आपल्या अदांनी गौतमी पाटील अनेकांना वेड लावले असून त्यांचे किस्से राज्यभरातून समोर येत असताना आता तासगाव तालुक्यातील वायफळेतून असाच एक किस्सा समोर आला आहे. गौतमी पाटील चा तासगाव तालुक्यात 21 मे रोजी तासगावातील वायफळे येथे कार्यक्रम होणार आहे. गौतमी चा कार्यक्रम तोही पहिल्यांदाच तासगाव तालुक्यात होत असल्यामुळे या कार्यक्रमाची तालुक्यात गौतमीच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
या गावातील एका बसचालकांनी वरिष्ठाकडे थेट या कार्यक्रमासाठी दोन दिवस रजेची मागणी केली आहे.तसा उल्लेखही रजेच्या अर्जावर केल्याने चर्चा आणखीन रंगली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी हे नाव सध्या हॉट टॉपिक बनलं आहे.लावणी क्वीन असणाऱ्या गौतमीचा कार्यक्रम तूफान गर्दीने बहरत असून प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले आहे.
आजवर केवळ पुरूष गौतमीची लावणी पाहण्यासाठी गर्दी करत होते. पण आता तर महिला देखील गौतमीच्या तितक्यात फॅन झाल्या असून तिला पाहण्यासाठी त्या देखील गर्दी करताना दिसत आहेत. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरूण वर्ग उतावळा होत असताना आहे.तासगावातील या जबऱ्या फँनमुळे पुन्हा राज्यभर चर्चेला उधान आले असून नेमकी रजा मिळणार का? याबाबत अद्याप मात्र काहीही माहिती समोर आलेली नाही.
मात्र व्हायरल होत असलेल्या सुट्टीच्या अर्जावर 11 मे 2023 ही तारीख दिसत आहे. अर्ज करणारा कर्मचारी हा एसटी आगारात चालक म्हणून काम करतोय. त्यानं 22 मे आणि 23 मे 2023 रोजी सुट्टी हवी असल्याचं नमूद केलं आहे. 2 दिवसांच्या सुट्टीची त्यानं विनंती केलीये आणि विशेष म्हणून सुट्टीचं कारण त्यानं मोठ्या ठळक अक्षरात लिहिलंय.गावात “गौतमी पाटील येणार आहे म्हणून दोन दिवस रजा मिळावी”, असं त्यानं लिहिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.