अधिक माहिती अशी की, सांगलीतील हरिपूर रोड परिसरात राहणाऱ्या साधना जयंत सातपुते या महिला मुलीसह दुचाकीवरून जात होत्या.कोल्हापूर रोडवरील एसटी विभागीय कार्यालयाजवळ त्या आल्या असता, त्यांची दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे दोघीही दुचाकी चालवत चालल्या होत्या. यावेळी संशयित तिघे दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेकडून आले.त्यांनी सातपुते यांच्याजवळ थांबत त्यांना काय झाले आहे असे विचारले. पंक्चर झाल्याचे सांगताच संशयितांनी त्यांना काही मदत करू का असे विचारले यावर सातपुते यांनी त्यांना नकार दिला. एवढ्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने सातपुते यांची पर्स हिसडा मारून ओढण्याचा प्रयत्न केला.
या गडबडीत सातपुते यांनी दुचाकी सोडून दिली पण पर्स सोडली नाही. त्यामुळे संशयितांनी त्यांना जवळपास दहा ते पंधरा फूट फरफटत नेले.त्याचवेळी पुढे चाललेल्या कारचालकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी दरवाज्या उघडल्याने तिघे चोरटे खाली पडल्याने त्यांना नागरिकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.फिल्मीस्टाईल घडलेल्या या प्रकार शहरात खळबंळ उडाली आहे.