बिंळूर-अथणी रस्त्यावर अपघात,परिचारिका ठार
जत : जत – अथणी रस्त्यावरून एका वाहनातून पडल्याने डोक्यास जबर मार लागल्याने परिचारिकेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना बसर्गी ता.जत येथे सोमवारी सायकांळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.रूपाली तानाजी जाधव-सुर्वे (वय ३५,रा.दुधाळवस्ती जत)असे मयत परिचारिकेचे नाव आहे.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,रूपाली जाधव या बसर्गीतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात परिचारिका पदावर कार्यरत आहेत.आज सोमवारीही त्या कामावरून परत महिंद्रा कमांडर गाडीतून येत असताना बसर्गीपासून काही अंतरावर चालकाने अचानक ब्रेक लावला.त्यावेळी रूपाली यांचा तोल जावून रस्त्यावर पडल्या.त्यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. दरम्यान चालकांनी त्यांना तातडीने बिळूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले,तेथे प्राथमिक उपचार करून जत येथील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले.
तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.सायकांळी जत ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.ऱात्री उशिरा जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.