आवंढीत ४ घरे फोडली,दागिणे लंपास : चोरट्यांचा धुमाकूळ

0
जत : आवंढी (ता. जत) येथील सोळगेवस्ती येथे शनिवारी मध्यरात्री चोट्यांनी बंद घरावर ‘डल्ला’ मारला. रोख रकमेसह साडेचार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.आवंढीपासून तीन किलोमीटर अंतरावर सोळगे वस्ती आहे तिथे मोहन महादेव कोडग यांच्यासह अन्य चार ते पाच जणांची कुटुंब वस्ती करून राहत आहेत. कोडग यांच्या गोठ्यावर शनिवारी रात्री सर्वजण झोपले होते.

त्यामुळे सर्वांची घरे बंद होती.चोरट्याने त्यांची बंद घरे फोडून रोख रकमेसह साडेचार तोळ्याचे दागिने लंपास केले. शेती विषयी महत्त्वाची कागदपत्रांची बॅगही पळविली. कोडग यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.