कल्पनाशक्ती आत्मसात करा !

0
प्रत्येकाच्या जीवनात कल्पनाशक्तीला खुप महत्व आहे.अफाट कल्पनाशक्ती ही माणसाला मिळालेली देणगीच आहे.प्रत्येकाने आपल्या जीवनात कल्पनाशक्तीचे महत्व समजावून घेणे गरजेचे आहे.आईन्सटाईन नेहमी म्हणायचे ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्वाची आहे.

 

जीवनात कल्पनाशक्ती असेल तर आपण जीवनात कोणतेही ध्येय साध्य करू शकतो.जगात अशी कुठलीही जादुची कांडी नाही आणी जादुने काही निर्माणही करता येत नाही.मात्र मनात जर आपल्या कल्पनाशक्ती असली की आपण यशापर्यंत पोहचू शकतो.फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे.
आपल्या जीवनात कल्पनाशक्ती आत्मसात केली तर तर आपण निश्चितच कायापालट करू शकतो.तेव्हा कल्पनांवर विचार करा.त्या सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा.आजपर्यंत जगात जे काही बदल व स्थित्यंतरे झाली ही कल्पनाशक्तीतुनच झाली आहे.यात काही शंका घेण्याचे कारण नाही.आदीमानवाने दगडावर दगड घासुन उर्जेची निर्मिती केली.व अग्नीचा शोध लागला. गुहेच्या बाहेर रेघोट्या मारत त्यातूनच चित्रकलेचा शोध लागला.गुणगुणन्यातुन गाण्याचा जन्म झाला.हे सारे कल्पनाशक्तीमुळेच शक्य झाले.
कल्पनाशक्ती आत्मसात करण्यासाठी मनाची एकाग्रता लागते.प्रंचड आत्मविश्वास लागतो.आज आपण पाहतो जगात जेवढी माणसं यशस्वी  झाली.मग आपण का नाही होणार त्यांच्यात अफाटशक्ती होती.आपणदेखील आपली कल्पनाशक्ती आत्मसात केली पाहिजे.तेव्हा आपण यशाचे शिखर गाठू शकतो.जीवनात कल्पनाशक्तीला खुप महत्व आहे.यशाकडे वाटचाल करत असताना कल्पनाशक्ती हा पहीला टप्पा आहे.
नव्या वाटेने चालणे हे सोपे कधीच नसते.परंतू रूळलेल्या वाटेने जाणे कधीही फायदेशीर ठरते.आपल्या  जीवनात नावीन्यपूर्ण कल्पना जोपर्यंत आपल्या मनात येत नाही.तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही.जग बदलण्याची ताकद आपल्यात आहे.कल्पनाशक्ती ओळखून आत्मसात करून ती विकसित करणे गरजेचे आहे.नशिबाने आपल्याला काही मिळेल हा भाबडा आशावाद सोडून द्या. मनात कल्पनाशक्ती असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कल्पनाशक्ती आत्मसात करा.यश मिळवायचे असेल तर कल्पनाशक्ती आत्मसात करणे गरजेचे आहे.
संतोष दत्तू शिंदे
काष्टी,(ता.श्रीगोंदा)
मो.७७२१०४५८४५
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.