जतकरांनो सांभाळा, दुपारी ३ वाजेपर्यंत धोका, घराबाहेर न पडनेच बरे

0

जत : जत तालुक्यात वातावरणातील उष्णता पाहता पुढील आणखीन काही दिवस सुर्य कोपणार असल्याने कमालीचे तापमान वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज रविवारी जत तालुक्यात उष्णतेचा पारा ३८ अंश सेल्सिअसच्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे कामाव्यतिरिक्त उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.हवामान खात्याकडून सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.