खताची वाहतूक करताना पुलावरून ट्रॅक्टर कोसळला,शेतकरी ठार

0
2

जत : जत तालुक्यातील माडग्याळ जवळ सनमडी-माडग्याळ रस्त्यावर दामूच्या ओढ्यावरील ट्रँक्टर घेऊन चाललेल्या शेतकऱ्यांचा पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळल्याने शेतकरी ठार झाला आहे. अशोक सन्मुख माळी (वय ४७ रा. माडग्याळ) असे ठार झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.सोमवारी सकाळी हि घटना घडली असून याबाबत उमदी पोलीसात नोंद आहे.

 

अधिक माहिती अशी,माडग्याळजवळील श्री खंडोबा मंदिर नजिकच्या शेतात शेतकरी अशोक माळी हे कुटुंबिसह राहतात.ते गावातील परिट वस्ती येथून शेणखत घालण्यासाठी खत विकत घेतले होते.सोमवारी सकाळपासून शेतकरी माळी हे शेतात स्वतः ट्रॅक्टरने खत आणत होते.सकाळपासून दोन खेपा खत आणले होते. शेतात खत ओतून ते रिकामा ट्रॅक्टर घेऊन परीट वस्तीकडे निघाले होते.

 

गावाजवळील सनमडी-माडग्याळ रस्त्यावर वळण असलेल्या दामूच्या ओढ्यातील अरुंद पूलावर समोरुन येणाऱ्या वाहनाचा अंदाज आला नाही,परिणामी वाहनाला बाजू देताना अचानक पुलावरून माळी यांचा ट्रॅक्टर खाली कोसळला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.ट्राॅली पुलाच्या कठड्याला अडकली; तर ट्रॅक्टरचे तोंड ओढ्यात पडले.त्यात ट्रॅक्टरचे इंजिन व स्टेअरिंगखाली शेतकरी अशोक माळी अडकून पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली,तात्काळ ग्रामस्थांनी ट्रॅक्टर बाजूला काढत त्यांना बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांच्या डोक्याला, छातीला जोराचा मार लागल्याने त्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला.

 

पार्थिवावर जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मयत अशोक माळी यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे. ते पेपर विक्रेते भीमाण्णा माळी यांचे मोठे भाऊ होत.सर्वांशी मिळून मिसळून राहणारे माळी यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here