खताची वाहतूक करताना पुलावरून ट्रॅक्टर कोसळला,शेतकरी ठार
जत : जत तालुक्यातील माडग्याळ जवळ सनमडी-माडग्याळ रस्त्यावर दामूच्या ओढ्यावरील ट्रँक्टर घेऊन चाललेल्या शेतकऱ्यांचा पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळल्याने शेतकरी ठार झाला आहे. अशोक सन्मुख माळी (वय ४७ रा. माडग्याळ) असे ठार झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.सोमवारी सकाळी हि घटना घडली असून याबाबत उमदी पोलीसात नोंद आहे.

मयत अशोक माळी यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे. ते पेपर विक्रेते भीमाण्णा माळी यांचे मोठे भाऊ होत.सर्वांशी मिळून मिसळून राहणारे माळी यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.