आजी माजी सैनिक संघटनेकडून पोलीस भर्ती झालेल्या तरूणांचा सत्कार

0
ढालगाव : आजी माजी सैनिक संघटना ढालगाव आणि स्वराज कलेक्शन ढालगाव यांचे कडून पोलीस दलामध्ये भरती झालेल्या मुला मुलींचा भव्य सत्कार करण्यात आला.नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस भरतीचा निकाल लागल्याने ढालगाव मधील ४ मुलींना, आरेवाडी मधील दोन मुले तसेच डोरली मधील दोन मुलांचा सहभाग होता, त्यामध्ये प्रामुख्याने सुजाता सयाप्पा घोदे, प्रियांका विजय मलमे, प्रणाली भाऊसो घोदे, रूपाली भाऊसो घोदे सर्वजण राहणार ढालगाव , विश्वास आण्‍णासो कोळेकर ,सुनील आबासो बाबर  दोघेही राहणार आरेवाडी आणि संतोष सुभाष माने,प्रवीण यशवंत माने दोघेही राहणार डोरली या सर्व मुलांचा आणि या मुलांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या त्यांचा आई-वडिलांचा सुद्धा सत्कार स्वराज कलेक्शन ढालगाव आणि आजी-माजी सैनिक संघटना ढालगाव यांचे वतीने स्वराज कलेक्शन ढालगाव येथे पार पडला.
आर्थिक परिस्थिती हलाकीची असलेल्या तसेच दररोज कष्ट करून जगणाऱ्या गरीब परिवारातील मुला-मुलींनी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.
सत्कार समारंभावेळी बोलताना महांकाली साखर कारखान्याची माजी संचालक भाऊसाहेब पाटील म्हणाले की,मुलांनी मिळवलेल्या यशाचा आदर्श बाकीच्या तरुण तरुणीने घ्यावा माजी सैनिक असलेले स्वराज कलेक्शनचे मालक अजितराव खराडे हे नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करीत असतात.
Rate Card
शिवाजी देसाई सर म्हणाले, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या सत्कारामुळे इतर विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळावी आणि यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या इतर मित्र मैत्रिणींना मार्गदर्शन करावे आणि सेवेमध्ये मिळालेली ड्युटी योग्य पद्धतीने पार पाडून आपले तसेच आपल्या गावाचे नाव उज्वल करावे.
सर्व यशस्वी झालेल्या मुला-मुलींनी स्वराज कलेक्शनचे मालक माजी सैनिक श्री अजितराव खराडे आणि आजी माजी सैनिक संघटना ढालगाव यांचे आभार मानले.यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे दत्तू घागरे पोपटराव काबुगडे,नारायण देसाई, विठ्ठल देसाई ,तानाजी घागरे, मोहन देसाई, राजाराम देसाई, शामराव मायने, दिलीप देसाई, मच्छिंद्र देसाई ,बापू घागरे ,हेमंत देसाई तानाजी घोदे ,ढालगाव सोसायटीचे चेअरमन जनार्दन देसाई, माजी उपसरपंच माधवराव देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान वाघमारे, भाऊसाहेब पाटील शिवाजी देसाई सर गजबार तांबोळी, मारुती गडदे,राधे ट्रेडर्सचे अमित देसाई नाना देसाई, सतीश देसाई , प्रवीण देसाई तसेच सर्व यशस्वी मुला मुलींचे पालक गावातील इतर राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.