ब्रेकिंग | ट्रक व एसटीचा भिषण अपघात,५ ठार,१३ जखमी

0

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व एसटी बसची धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात पाचजण ठार झाले आहेत,तर तब्बल १३ जण जखमी झाले आहेत,त्यापैंकी पाचजणांची प्रकृत्ती चिंताजनक आहे.त्यांच्यावर खिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुंबई-संभाजीनगर-औरंगाबाद महामार्गावरील सिंदखेडराजा जवळील पळसखेड चमकत येथे हा मोठा अपघात झाला.अपघातग्रस्त बस हि छत्रपती संभाजी नगरहून वाशिमकडे निघाली होती.

Rate Card

हेही वाचा-द्राक्ष,बेदाणा उत्पादकांसाठी कामाची बातमी | सांगलीत होणार बैठक

सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून हे बस वाशिमच्या दिशेने जात होती त्याचवेळी ट्रक व बसची भिषण धडक झाली.या अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला असून अन्य चारजणाचाही मृत्यू झाला आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बचावकार्य गतीने सुरु करण्यात आले आहे.

हेही वाचा-खताची वाहतूक करताना पुलावरून ट्रॅक्टर कोसळला,शेतकरी ठार

सध्या या राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अपघात ठिकाणी थांबली आहे.दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.ही धडक इतकी जोरदार होती की,या अपघातात पाच लोक जागीच ठार झाले आहेत.तर १३ जण जखमी झाले असून त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याती माहिती मिळत आहे.स्थानिक व पोलीसाकडून बचावकार्य सुरू आहे.जखमींना तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.