कोल्हापूरमध्ये पावनेआकरा कोटीची व्हेल माशाची उलटी(अंबरग्रीस) जप्त
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांना ५ जणांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोली आजरा मार्गावर संशयितांना पकडून त्यांच्याकडून तब्बल १० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.
कोल्हापूर पोलिसांची आजपर्यतची सर्वात मोठी कारवाई आहे.सातत्याने व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी करणाऱ्यांच्या कोल्हापूर पोलिसांनी उलटी जप्त करत संशयितांना अटक केलेली आहे.आज पुन्हा व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेवून जात असताना कारवाई केली आहे.
