सातारा दरोड्यातील दरोडेखोर जेरबंद,१८ किलो चांदी,११ तोळे सोने जप्त

0

पुणे  : सातारा जिल्ह्यात कुरीअर कंपनीच्या सोने-चांदीच्या विटा चोरून फरारी झालेली टोळीला अखेर यवत पोलिसांनी जेरबंद केली आहे.संशयित चार जणांना यवत पोलिसांनी पुणे- सोलापूर महामार्गावर कासूर्डी टोलनाका येथे रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.कोल्हापूर येथील एका कुरिअर कंपनीचे कर्मचारी रात्री दोन वाजता पिकअप गाडीतून सोन्याच्या विटा आणि चांदी घेऊन पुण्याला निघाले होते.

 

कुरिअरची गाडी सातारा जिल्ह्यातील बोरगाव हद्दीत आल्यानंतर चार ते पाच चोरट्यांनी सशस्त्र दरोडेखोरांनी पिकअप चालकावर सह कर्मचाऱ्या कसलातरी स्प्रे  मारून शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी अंदाजे सात किलो वजनाच्या सोने आणि चांदीच्या विटांची लूट केली होती.पोलिसांनी माहिती मिळताच शोध सुरू केला होता.दरोडेखोरांनी वापरलेली पिकअप महामार्गावर सापडली होती.मात्र चोरटे अन्य वाहनातून मुद्देमाल घेऊन पसार झाले होते.

 

सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोने आणि चांदीच्या विटा घेऊन जाणारे पिकअप गाडी अडवून त्यातील ऐवज घेऊन संशयित पसार झाल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता.पुणे एलसीबीच्या पथकाने हि कारवाई केली आहे. या टोळीकडून 18 किलो चांदी आणि 11 तोळे सोने ताब्यात घेण्यात आले आहे.आणखीन चार किलो सोन्यापेक्षा जादा ऐवज घेऊन दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.

Rate Card

त्यांचा शोध पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.दरोडेखोरांनी वापरलेली इंनोवा गाडी देखील ताब्यात घेतली आहे.सबंधित सोने व चांदी हे कुरिअर ने घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संशयित दरोडेखोरांनी यांची पाळत ठेवून हा दरोडा टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

 

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, केशव वाबळे यांच्या पथकांने नाकाबंदी करत या टोळीच्या‌ मुशक्या आवळल्या आहेत.फरारी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने श्वान पथकाला देखील पाचारण केले आहे.विविध भागात पथकाकडून शोध मोहिम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.