अचकनहळ्ळीच्या सुकन्या विजयमाला (ताईसाहेब)पतंगरावजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

जत : अचकनहळ्ळी गावच्या सुकन्या विजयमाला (ताईसाहेब)पतंगरावजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे अचकनहळ्ळी ता.जत येथे शुक्रवार ता.२ जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती,समाधान शिंदे यांनी दिली.दरवर्षीप्रमाणे ताईसाहेब यांच्या २ जून या वाढदिनी सायंकाळी ६ वाजता शब्दसम्राज्ञी डॉ.सौ.स्वाती शिंदे-पवार यांचे गावतलं गावपण,माणसातलं माणूसपण,संपत चाललय! या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू सोहळाही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री.यल्लाम्मादेवी प्रतिष्ठानच्या सचिव श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे,विक्रम फौंऊडेशनच्या संचालिका सौ.वर्षाताई विक्रमसिंह सावंत या प्रमुख उपस्थित राहणार आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात हा कार्यक्रम होणार आहे.

Rate Card

ग्रामपंचायत अचकनहळ्ळी, भारती विद्यापीठ परिवार,अचकनहळ्ळी, श्री. बिसल सिध्देश्वर देवस्थान कमिटी,अचकनहळ्ळी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यांचा पंचक्रोशीतील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.