प्रकाशराव जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी महाआरोग्य शिबिर | येळवीत रक्तदान शिबीर व शिलाई मशीनचेही होणार वाटप

0
3
जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा जत तालुक्याचे लोकप्रिय लाडके नेते प्रकाशराव जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे, सचिव विजय रुपनर, जय मल्हार फौंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक हेमंत चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाढदिवसानिमित्त जत शहरात खास महिलांसाठी महाआरोग्य शिबिर व येळवी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जत तालुक्याच्या राजकारण आणि समाजकारणात प्रकाशराव जमदाडे हे गेल्या २५ वर्षापासून निष्ठेने काम करीत आहेत. गोरगरिबांचा नेता अशी त्यांची विशेष ओळख आहे. सांगली बाजार समिती, रेल्वे बोर्ड आणि आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून जत तालुक्यातील विविध विकासाचे प्रश्न प्रकाशराव जमदाडे यांनी अतिशय तळमळीने सोडवले आहेत.

आज शेतकऱ्यांसाठी थेट बांधावर जाऊन काम करणारा नेता म्हणून संपुर्ण तालुका त्यांच्याकडे पाहतो. दरवर्षी त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रमाने एक जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात येतो, यंदाही तालुक्यातील जमदाडे समर्थकांनी रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिर, वृक्षारोपण,शालेय साहित्यांचे वाटप असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.अनेक गावात या निमित्ताने छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे फाउंडेशन
प्रकाशराव जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून जत तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम सतत राबविण्यात येतात. दर महिन्याला विविध प्रकारचे लोकोपयोगी उपक्रम हे फाउंडेशन करीत आहे. सामाजिक भान ओळखून या फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे, याच माध्यमातून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी जत शहरात आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन सांगलीचे खासदार संजय काका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप,डॉक्टर रवींद्र आरळी, डॉक्टर मनोहर मोदी, शिवसेना नेते योगेश जानकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.तर येळवी येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच आरती अंकलगी  व गटातील मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. याच ठिकाणी गावातील काही गरजू महिलांना शिलाई मशीनचे देखील वाटप करण्यात येणार आहे.  या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ  घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी रवींद्र मानवर, हेमंत चौगुले, अविनाश वाघमारे, रियाज शेख, उत्तमशेठ चव्हाण, योगेश होनमाने आदी पदाधिकारी उपस्थित होते
                     हार तुरे नकोत
साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणारे कार्यकर्ते, हितचिंतक यांनी कोणत्याही प्रकारचे हार , पुष्पगुच्छ, फेटे, भेटवस्तू न आणता सामाजिक बांधिलकी म्हणून वही पेन असे शैक्षणिक साहित्य द्यावे.  जेणेकरून आपल्या तालुक्यातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी या वस्तूंचा उपयोग होईल. तसेच फाउंडेशनच्या वतीनेही आणखीन काही वह्या व शालेय साहित्य उपलब्ध करून ते तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये वाटप केले जाणार आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here