शेगाव,वाळेखिंडी,बेवनूरमधील रस्त्याचे भूमिपुजन | या पाच रस्त्याचे होणार डांबरीकरण

0शेगाव,संकेत टाइम्स : शेगाव,वाळेखिंडी, बेवनूर ता.जत येथील जिल्हा नियोजन,नाबार्ड व मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत मंजूर पाच रस्ता कामाचे भूमिपुजन माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्याहस्ते झाले.

अनेक दिवसापासून या रस्त्याची मागणी होती, अखेर या रस्त्याचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री सडक योजनेतून शेगाव-चपरासवाडी,बेवनूर ते शिंदे(काळवळ मळा) तर जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव यांच्या प्रयत्नातून मंंजूूूूूूूर झालेल्या वाळेखिंडी ते जाधववस्ती,शेगाव मधील गुळंवची रोड तर नाबार्ड मधून वाळेखिंडीतील महादेव मंदिर रस्त्यालगतच्या पुलाचे भूमिपुजन जगताप व शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.Rate Cardमाजी आमदार विलासराव जगताप म्हणाले,जत पश्चिम भागातील ‌अनेक वाड्यावस्त्याचे रस्ते पक्के व डांबरीकरणाचे करण्याचे आमचे नियोजन होते.त्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा केला होता.या रस्त्याचे आता मजबूतीकरण होणार असून नागरिकांची सोय होणार आहे.

यावेळी अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.प्रभाकर जाधव,माजी सभापती शिवाजी शिंदे,भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार,प्रमोद सावंत, संरपच सौ.सुनीता महादेव माने,उपसंरपच सचिन बोराडे,दत्तात्रय व्हनमाने,संजय बुरूटे,किशोर बुरूटे,हणमंत‌ माने,दिगंबर निकम,दादा पाटील,राजेंद्र नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.

आदी मान्यवर उपस्थित होते.


शेगाव ता.जत येथील रस्ता कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.