अलकूड(एम)येथे बिबट्या,शोध लागेपर्यत नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई ; तहसीलदार

0



सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकूड (एम) येथील पाझर तलाव ते गट नं. २९७ तुकाराम माने वगैरे यांची शेत जमीन ते अलकूड (एम) डोंगर भाग गट नं. २५० या परिसरात दि. १३ जून २०२१ रोजी दुपारी १ ते २ दरम्यान बिबट्या आढळून आल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. या अनुषंगाने सदर परिसरात बिबट्याचा शोध घेवून त्याला स्थानबध्द करून सुरक्षित स्थळी सोडणे आवश्यक असल्याने शोध मोहिमेकरीता आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची या परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी व वाहतूक 





नियंत्रणासाठी तहसिलदार बी. जे. गोरे यांनी सदर परिसरात दि. १३ जून २०२१ रोजीचे दुपारी ३ वाजल्यापासून ते शोध मोहिम संपेपर्यंत नागरिकांना व वाहनांना प्रवेश करण्यास तसेच सदर परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे.

Rate Card

अलकूड (एम) येथील पाझर तलाव ते गट नं. २९७ तुकाराम माने वगैरे यांची शेत जमीन ते अलकूड (एम) डोंगर भाग गट नं. २५० या परिसरात तहसिलदार बी. जे. गोरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) अन्वये वरीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत. 




या आदेशातील तरतुदीचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्थेविरूध्द बंदोबस्तास असणाऱ्या प्रभारी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, असे आदेश तहसिलदार बी. जे. गोरे यांनी जारी केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.