हैदराबाद येथे लिंगायत समाजाचे शक्तिप्रदर्शन | 24 वी बसवाभिमानी ऐतिहासिक रॅली | लाखोची उपस्थिती

0
जत : लिंगायत धर्माला संविधानात्मक आणि अल्पसंख्याक धर्म मान्यतेसाठी तेलंगणा राजधानी हैदराबाद येथे लिंगायत समाज महा महरॅलीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले.महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश,तमिळनाडू असे विविध राज्यातून आलेल्या लाखो बसवाभिमानी रॅलीला साक्षी झाले. लिंगायत धर्म समन्वय समितीने आयोजित केलेल्या महा रॅलीने संपूर्ण महानगर बसवमय झाले होते.हैदराबादच्या एक्झिबिशन ग्राउंड नांपल्ली येथे जमलेल्या अनेक मठाधीश, राजकारणी, लोकप्रतिनिधी, विविध संघटना प्रमुख, असंख्य शरण-शरणी समावेश झाले होते.

 

नंतर पब्लिक गार्डन पर्यंत महारॅली काढून तत्काळ लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म मान्यता द्यावा म्हणून केंद्र सरकारला तेलंगणा सरकारने शिफारस करावा असे आग्रह करण्यात आला.महिला व पुरुष, लहान-मोठे,कनिष्ठ -वरिष्ठ असे कोणताही भेदभाव न करता बसवानुयायी रॅलीत सहभागी झालेले विशेष वाटत होते. पांढरा पोषाख, षठस्थल चिन्हाचा स्कार्प, गांधी टोपीवर मी लिंगायत- माझा धर्म लिंगायत लिहिलेले, बसवध्वज व शरण वचन लिहिलेले बॅनरचे प्रदर्शन उठून दिसत होते.

 

बसवकल्याण अनुभव मंडप अध्यक्ष डॉ. बसवलींगपट्टदेवरु, कुडलसंगम बसवधर्मपीठाध्यक्ष डॉ.माता गंगादेवी,अक्क अन्नपूर्णा, अक्क डॉ.गंगांबीका,हुलसुर शिवानंदमहास्वामीजी, भालकी हिरेमठ गुरु बसव पट्टदेवरु,बेंगलोर चन्नबसव पीठाध्यक्ष डॉ. चन्नबसवानंद स्वामीजी, हैदराबाद अनिमिशानंद स्वामीजी, बेळगाव प्रभलिंग स्वामीजी,कल्याण महामने गुणतीर्थवाडी बसवप्रभू महास्वामीजी,केंद्रीय सचिव भगवंत खुबाजी, किशन रेड्डी,आमदार डॉ.शैलेंद्र बेल्दाळे,जहीराबाद माजी खासदार सुरेश सेटकार,राष्ट्रीय बसवदल, लिंगायत महासभा असे अनेक संघटनेचा पदाधिकारी सहभागी होऊन आपापले मनोगत व्यक्त केले.
Rate Card
कर्नाटकातील संघर्षाच्या फळ 2018 मध्ये काँग्रेस सरकारने न्यायमूर्ती नागमोहनदास समितीच्या अहवालानुसार लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी केंद्र सरकारला शिफारस केली आहे.या पद्धतीनेच तेलंगणा सरकारने केंद्राला शिफारस करावा असे आग्रह करण्यात आले.लाखोंच्या संख्येने उपस्थित सर्व शरण-शरणींना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.