क्रॉप सायन्स एक उत्तम करिअर 

0
विद्यार्थी मित्रांनो, बारावी नंतर करिअरचे विविध क्षेत्र आहेत त्यामध्ये क्रॉप सायन्स विषयाची माहिती ‌बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही त्यामुळे दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नेहमी गोंधळून गेलेले असतात.
भविष्याचा विचार करताना क्रॉप सायन्स या विषयामुळे कृषी क्षेत्रात उत्तम करिअर होते.पीक शास्त्र (क्रॉप सायन्स)विषयाचे अभ्यासक्रमातील महत्व आहे,भारत हा कृ‌षिप्रधान देश आहे. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे ६० ते ६५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.ग्रामीण भागातील लोकांची उपजिविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे.

 

महाराष्ट्रातील सुमारे ६७ लाख शेतकरी कुटुंबांकडे फक्त एक हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे.चाळीस लाख शेतकरी कुटुंबांकडे एक ते दोन हेक्टर इतकेच जमिनीचे क्षेत्र आहे. दोन ते चार हेक्टर एवढे क्षेत्र असणारे सुमारे २२ लाख शेतकरी आहेत.सात लाख शेतकऱ्यांकडे ४ ते १० हेक्टर क्षेत्र असून, १० हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे अत्यंत अल्प शेतकरी आहेत.यापैकी बरेचसे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची श्वाश्वती नसते.मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध असल्याने आणि सिंचनाच्या सुविधा मुबलक नसल्याने याच क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.
शेतकरी आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेती
उत्पादने वाढविणे शक्य होत आहे.शेती उत्पादन हे शेतीची आवश्यक मशागत, विविध निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि वेळेवर वापर या गोष्टींवर अवलंबून असते. कृषी उत्पादन वाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पेरणीसाठी सुधारीत बियाणे, खते, पीक किड व रोग संरक्षण करणारी औषधे उपलब्ध करता येतात.परंतु, वरील कृषी निविष्ठांशिवाय महत्त्वाची आणि गरजेची कृषी निविष्ठा म्हणजे कृषी तंत्रज्ञान. देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषी संशोधकांनी अभ्यास करून आणि विशेष परिश्रम घेऊन विविध विषयांसंबंधी सुधारित कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून करून दिले आहे.

 

पिकांचे सुधारीत वाण, खताच्या मात्रा,पेरणी पध्दती,सिंचनपध्दती, पाणी व्यवस्थापन, अंतर्गत मशागत, पीक संरक्षण, जमिनीची मशागत, सुधारित अवजारे व यंत्रे आणि इतर शेतीसंबंधी विषयावर सुधारित तंत्रज्ञान संशोधनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विविध पिके,भाजीपाला, फळशेती,
फुलशेती, पशुसंवर्धन, चारा पिके आणि यांत्रिक शेती याबाबत मोठ्या प्रमाणात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान आज उपलब्‍ध आहे.शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतकऱ्यांनी उपलब्ध कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादने वापरावेत, यासाठी कृषी
खात्यामार्फत विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये याविषयी प्रचार आणि प्रसार करीत असतात.
विविध माध्यमांचा वापर यासाठी केला जात आहे.शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.ग्रामीण भागातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी कृषी शिक्षण घेतले तर त्याचा निश्चितपणे फायदा होईल.प्रत्येक व्यवसाय करताना त्या व्यवसायासंबंधी आवश्यक शास्त्रीय ज्ञान गरजेचे असते.शिक्षणाद्वारे मिळविलेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग निश्चितपणे यशस्वी होण्यासाठी होतो, हे सिध्द झाले आहे.आज वैद्यकीय,अभियांत्रिकी,पशुसंवर्धन या विविध क्षेत्रात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत.या क्षेत्रातील मिळविलेल्या ज्ञानाचा तसेच तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे उपयोग होत आहे.

 

प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञान हे शास्त्रावर आधारीत असते.शास्त्र आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातलेली असते. तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञानाची व शास्‍त्रीय माहिती महत्त्वाची असते.शेती व्यवसाय हा शास्त्र आणि कला (कौशल्य) यावर आधारीत आहे. म्हणून शेती शास्त्राची आणि त्यातील कौशल्याची माहिती करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.पीक शास्त्र विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. याचे मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शेती व्यवसाय करण्याची क्षमता निर्माण करणे, शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे, आधुनिक शेती करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याची क्षमता निर्माण करणे तसेच तरुणांमध्ये शेती विषयाची आवड निर्माण करणे व सर्व प्रकारच्या कृषी व्यवस्थापनामध्ये नोकरी करण्यास कार्यक्षम करणे हे आहे.त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कृषी आधारित व्यवसाय करण्याची क्षमता देखील निर्माण होते.
Rate Card
तर आता आपण पीक शास्त्र म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊ. पीकशास्त्र या विषयांमध्ये प्रमुख अन्नधान्य फायबर पिके गळीत धान्य पिके मसाल्याची
पिके व चारा पिके यांचे उत्पादन तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांचा सखोल अभ्यास आहे.शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्ट्या उत्पन्न कशाप्रकारे वाढवता येईल तसेच कमी खर्चात कशाप्रकारे नियोजन करून आपला शेतकरी प्रगतशील बनेल या उद्देशाने पीक शास्त्र विषय ठेवलेला आहे हा विषय 200 मार्कचा असून यामध्ये 120 मार्क प्रात्यक्षिक व 80 मार्क लेखी परीक्षा घेण्यात येते. या विषयामुळे विद्यार्थ्यांना शेती विषयाचे ज्ञान मिळते तसेच आवड निर्माण होते. पीकशास्त्र विषयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी म्हणजेच बीएससी एग्रीकल्चर मध्ये प्रवेश घेताना वीस टक्के मार्क वाढतात व कृषी विभागाशी संबंधित सरकारी नोकरीसाठी लागणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थी चांगले मार्क घेऊ शकतात व भावी आयुष्यात फायदा होऊ शकतो.
पीकशास्त्र या विषयाचा हायस्कूल व जुनिअर कॉलेज च्या अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये टक्केवारी वाढवण्यास मदत होते. शेती निगडित विषय असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय सोपा व आवडीचा विषय होतो.वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अन्नधान्याची मागणी वाढली खूप वाढली आहे.या समस्येवर उपाय म्हणून आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करून उत्पादन वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी पीक शास्त्र विषय अतिशय महत्त्वाचा ठरतो.हा विषय आमच्या फॅबटेक पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज, (क्रॉप सायन्स) सांगोला या ठिकाणी उपलब्ध आहे.
पीक शास्त्र विषयाचे अभ्यासक्रमातील महत्त्व व फायदे
पीक शास्त्र विषयाची निवड केल्यामुळे विद्यार्थ्यांना बारावीनंतर विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात जसे की कृषी सहाय्यक, बीज उत्पादन सहाय्यक, पीक उत्पादन सहाय्यक, बीज पिक निरीक्षक, सिंचन तंत्रज्ञ ,कृषी प्रकल्प तंत्रज्ञ, ऊती संवर्धन तंत्रज्ञ. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेक स्वयं रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात जसे की ॲग्री क्लिनिक,रोपवाटिका, हरितगृह ,सेंद्रिय खत उत्पादन, बीज उत्पादक, बीज प्रक्रिया प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती,कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पीक शास्त्र विषय निवडल्यानंतर विविध उच्च शिक्षणाच्या संधी आहेत.बीएससी एग्रीकल्चर बीएससी हॉर्टिकल्चर एग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी व अनेक पर्याय शिक्षणासाठी उपलब्ध होतात.विद्यार्थ्यांनी पीक शास्त्र विषय कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये निवडून आपले भविष्य उज्वल करावे व शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञान वापरून चांगल्या दर्जाचे कृषी उत्पन्न करून देशाची आर्थिक प्रगती करावी.पीक शास्त्र (क्रॉप सायन्स) विषय आपल्या फाबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सांगोला या ठिकाणी अकरावी व बारावीसाठी उपलब्ध आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विषयाचा लाभ घ्यावा.
प्रा. नयन बापूसाहेब देशमुख
(क्रॉप सायन्स)
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगोला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.