जत : जत तालुक्यातील खोजनवाडी तलावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडणे संबंधी आवश्यक कामाची पाहणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी करून म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आवश्यक कामे करून घेऊन खोजनवाडी तलावात पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मल्लेश कत्ती,म्हैसाळ योजनेचे अधिकारी ,खोजनवाडी संगमेश्वर विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन शंकर काराजनगी, व माजी चेअरमन मुत्ताना काराजनगी,बसवराज बिदरी,सुरेश काराजनगी,तुकाराम शिवणुर, आणि खोजनवाडी गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.