कवलापूरला विमानतळासाठी मोदींना ५० हजार पत्रे पाठवणार | – पवार, साखळकर | सोमवारी मोहिमेचा प्रारंभ

0

सांगली : कवलापूर येथील १६० एकर जागेवर विमानतळ व्हावे, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवली जाणार आहेत. सांगलीकरांच्या सहभागाने ही मोहिम राबवली जाणार असून ५० हजार आंतरदेशीय पत्रे पाठवली जाणार आहेत. सोमवारी (ता. १९) सकाळी १० वाजता मारुती चौकातून त्याची सुरवात होणार आहे. विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार आणि सतीश साखळकर यांनी ही माहिती दिली.

कवलापूर येथील विमानतळासाठी कवलापूर पंचक्रोशीसह सांगलीकरांचा जनरेटा वाढला आहे, मात्र दिल्लीच्या पातळीवर हा आवाज अजून पोहचलेला नाही. विमानतळ बचाव कृती समितीने नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विमानतळाला मान्यतेची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह आमदार अनिल बाबर यांनीही त्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली आहे, परंतू हालचाली थांबलेल्या आहेत. त्या पुन्हा सुरु करण्यासाठी तब्बल ५० हजार पत्रे दिल्लीला पाठवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

श्री. पवार व श्री. साखळकर म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सांगलीकरांचा आवाज पोहचणे गरजेचे आहे. तो अन्य कोणत्याही माध्यमातून किती प्रभावीपणे पोहचेल, याबाबत साशंकता आहेत. त्यामुळे प्रत्येक सांगलीकराने एक पत्र मोदींना लिहावे, असे आम्ही नियोजन केले आहे. पन्नास हजार पत्रे पोहचल्यानंतर पंतप्रधान कार्यालय नक्कीच दखल घेईल, अशी आम्ही आशा आहे.

Rate Card

कवलापूरचे विमानतळ हे सांगलीच्या भविष्यासाठी अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे ‘मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा समृद्ध सांगली की पहचान’, असा नारा देणारा पत्रव्यवहार आपण करायचा आहे. त्यात सर्वपक्षिय, सर्व घटकांतील लोक, तरुण, तरुणी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक सहभागी होतील. जागोजागी स्टॉल लावले जातील. शाळा, महाविद्यालयांत जावून पत्र दिली जातील. प्रत्येकाने आपली भावना चार ओळीत लिहून ते पत्र दिल्लीला पाठवायचे आहे.’’

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.