सांगलीत बांधकाम व्यवसायिकांचा गोळ्या घालून खून | चार संशयितांना पकडले

0

सांगली : सांगली शहरातील बांध काम व्यवसायिकांचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.गोळीबाराने शहर हादरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा बांधकाम व्यवसायिक असलेले नालसाब मुल्ला यांच्यावर अज्ञातांकडून बेधछूट गोळीबार करण्यात आला आहे.यात नालसाब मुल्ला गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.

 

मात्र त्यांचा मृत्यू झाला.मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. शहरातल्या 100 फुटी रस्त्याजवळ ही शहर हादरवणारी घटना घडली आहे. मुल्ला यांच्या राहत्या घराच्या समोर ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी योग्य संधी साधत मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्या आहेत व अंधाराचा फायदा घेत ते पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.पोलीसांनी घटनास्थळी पोहचत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

राहत्या घराच्या दारात बसलेले असताना हल्लेखोरानी गोळ्या झाडल्या आहेत.या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला हे आपल्या राहत्या घराच्या दारात बसले होते. यावेळी काही हल्लेखोर आले. त्यांनी नालसाब यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते तिथून पसार झाले.अज्ञात आरोपी हे गजबजलेल्या परिसरात आले.

त्यांनी गोळीबार केला. नंतर ते तिथून लगेच पळूनही गेले. पोलीस आता आरोपी नेमके कोणत्या दिशेला पळून गेले, हल्ल्याचं नेमकं कारण काय, नेमकं काय घडलंय, याची सविस्तर माहिती घेत आहेत.जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, डीवायएसपी अण्णासाहेब जाधव आणि इतर पोलीस अधिकार घटनास्थळी भेट देत तपासाच्या सुचना दिल्या आहेत.

 

बाबा ग्रुपचा सर्वेसर्वा नालसाब मुल्ला खून प्रकरणात चार आरोपी जेरबंद

Rate Card

सन 2019 च्या मोका गुन्ह्यात कारागृहात असलेला एका संशयिताला जामीन न होऊ देण्यासाठी व त्याला बाहेर येता येवू नये यासाठी नालसाब मुल्ला हा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून चार आरोपीनी गुन्हा केला असल्याची माहीती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिली.खूनाचा गुन्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, sdpo आण्णासाहेब जाधव, सांगली lcb pi सतीश शिंदे, विश्रामबाग pi संजय मोरे यांनी 24तासाच्या आतच उघडकीस आणला.सांगली पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे.

संशयित आरोपीची‌ नावे

१) सनी सुनील कुरणे वय.२३ वर्षे रा.जयसिंगपुर ता.शिरोळ जि. कोल्हापुर
२) विशाल सुरेश कोळपे वय. २० वर्षे रा.लिंबेवाडी ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
३) स्वप्नील संतोष मलमे वय. २० वर्षे रा.खरशिंग ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
४) एक विधी संघर्षीत बालक आशा चार जणांना ताब्यात घेतले आहे , ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानी केली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.