संख : जत तालुक्यातील संख येथील ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे.हा प्रकार उघडकीस येवू नये म्हणून विरोधक ग्रामपंचायत व गावची बदनामी करत आहेत.संख ग्रामपंचायतीच्या सन २०१७ ते २०२२ च्या मधील सर्व आर्थिक व्यवहार व कारभाराची स्वंतंत्र समिती नेमून चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी गटाचे नेते दयगोंडा बिराजदार,आय.एम.बिराजदार व उपसरपंच सुभाष पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी गटाचे नेते पत्रकार परिषदेत म्हणाले, गत ५ वर्षात आम्ही चांगल्या कामाला साथ दिली.त्यांच्या कारभारात कधी अडवे पडण्याची भूमिका घेतली नाही आमचे नेते बसवराज पाटील यांच्या शिकवणी प्रमाणे गावचा कारभार सर्वानुमते व्हावा या उद्देशाने आम्ही काम केले. परंतु लोकशाही प्रमाणे झालेल्या निवडणुकीत यावेळी गावाने एकहाती सत्ता पुन्हा बसवराज पाटील यांच्याकडे सोपवली आहे.
पाटील यांच्याकडे सत्ता आल्यापासून आम्ही पाणी पुरवठा व गावच्या मुलभूत सुविधा, नव्या योजना यासाठी गतीने काम करत आहोत. परंतु विरोधक आणि कांही विघ्नसंतोषी लोक विनाकारण चांगल्या कामाला खो घालत आहेत. गावची व सत्ताधारी गटाची बदनामी व्हावी यासाठी घाणेरडे राजकारण करत आहेत.नाहक बदनामी केली जात आहे, आम्ही गावकऱ्यांना एकत्र बोलावून हा प्रकार समोर आणणार आहोतच, तसेच जिल्हा प्रशासनाला देखील कळवणार आहे,असेही दयगोंडा बिराजदार,आय.एम.बिराजदार,सुभाष पाटील यांनी सांगितले.
मागील पाच वर्षातील कामांची चौकशी करासंखमध्ये गेल्या पाच वर्षात ज्यांनी कारभार केला, त्या कारभारात अनेक संशयास्पद गोष्टी झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळेच गेल्या पाच वर्षातील कारभाराची स्वतंत्र यंत्रणे मार्फत चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठरावही घेतला आहे.,असे उपसरपंच सुभाष पाटील यांनी सांगितले.