जत : तालुक्यातील १५ गावात नवे तलाठी व मंडल कार्यालयाच्या इमारती उभ्या राहणार आहेत.आमदार गोपीचंद पडळकर यांनी या १५ गावात नव्या इमारती उभाराव्यात यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.आ.पडळकर यांच्या मागणीला महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद येत्या १७ जुलैपर्यंत या संदर्भाचा अहवाल प्रस्ताव सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
जत तालुक्यातील खलाटी,जिरग्याळ, मुचंडी, बाज,शेड्याळ, प्रतापूर, सोनलगी,पाच्छापूर, करेवाडी (को.बो.),सोरडी, पांडोझरी, मोरबगी,गोंधळेवाडी, सोन्याळ, उंटवाडी या गावातील मंडल कार्यालय व तलाठी कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत.या गावात नव्या इमारती उभाराव्यात यासाठी आ.गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता.
या मागणीनुसार महसूल मंत्र्यांनी अहवाल व नव्या इमारतीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावेत,असा आदेश जिल्हाधिकारी यांना दिला आहे. दुष्काळी जत तालुक्यात अनेक वर्षे झाली पण तलाठी व मंडल कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या असल्या तरी त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. महसूल मंत्री यांच्याकडे आपण पाठपुरावा केला असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.तालुक्यातील अन्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आ.पडळकर यांनी सांगितले.