जत : जत पुर्व भागात कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून आलेल्या पाण्यातून सहा ते सात तलाव भरले आहेत.त्यामुळे मी कर्नाटक सरकारकडे पाणी सोडावे म्हणून पाठपुरावा केला,जेथून सहज पाणी मिळू शकेल तेथे प्रयत्न सुरू आहेत. मात्र विरोधातील विलासराव जगताप यांनी त्यांचे भाजपाचे सरकार असताना कुठल्याच कामासाठी पाठपुरावा केला नाही.जगताप यांना भाजप गृहीतचं धरत नसल्याची टीका आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केले.
दुष्काळी सुविधा द्याव्यात म्हणून आम्ही उपोषण केले.जगताप यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी याचेही भांडवल करत बेताल आरोप केले. मुळात सरकार त्यांचेच असताना त्यांनी आमच्यापेक्षा जास्त पाठपुरावा करणे गरजेचे होते. मात्र आम्ही सरकार नसताना शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या एकच भावनेने कर्नाटक व महाराष्ट्र सरकारकडे सतत प्रयत्न करतो आहे. कदाचित जतला न्याय न देणाऱ्या लोकांच्या मनात हे खुपत असावे असे वाटते.
सावंत म्हणाले,गेल्या साडेतीन वर्षात तालुक्यातील विज समस्या, कृषी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांसाठी सरकारकडे भांडून प्रश्न मार्गी लावले आहेत. जलसंपदा विभागाशी संपर्क करून वारंवार म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले. याशिवाय विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहोत.जनतेने विरोधकांचे मनसुबे ओळखले आहे. त्यामुळे आता त्यांनी नौटंकी थांबवावी,असेही आ.सावंत म्हणाले.
यावेळी आप्पाराया बिराजदार, सभापती सुजय शिंदे, सरदार पाटील, बाबासाहेब कोडग, अशोक बन्नेनवर, भूपेंद्र कांबळे, महादेव कोळी, बिराप्पा शिंदे, सलीम पाच्छापुरे, परशुराम मोरे, दिलीप सोलापुरे, मारुती पवार, शिवकुमार तंगडी आदी उपस्थित होते.




