नशीबाने नाही तर कर्तृत्वाने मोठे व्हा!

0
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रचंड स्पर्धा आहे.असा कोणताही माणूस नाही की त्याला कोणत्या अडचणी नाहीत.अनेक प्रश्न आहेत आणि ते स्वतःलाच सोडवायचे असतात.आज माणसांमध्ये आळशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. कमी श्रमात मोठे होण्याचे स्वप्न माणूस पहात आहे.खरं म्हणजे आपल्या आयुष्यात नशीबाचा भाग एक टक्का असतो बाकी नव्ह्यांनव टक्के  आपल्या परीश्रमावर अवलंबून असतात.
आज आपण पाहतो शुन्यातुन विश्व निर्माण करणारी माणसं या जगात आहेत.जी आपल्या कार्यकर्तृत्वामुळे  यशस्वी झाली.जी माणसं आपले कर्तृत्व दाखवतात तीच माणसं आयुष्यात मोठी होतात.ज्यांना जीवनात कर्तृत्व घडवायचे आहे.त्यांनी वेगवेगळी अंगभूत कौशल्य आत्मसात केली पाहिजे.आपले कर्तृत्व स्वतालाच निर्माण करायचे असते.ते काही उसने बाजारात मिळत नाही.कर्तृत्वान माणसांकडे  पाहीले की त्यांनी त्यासाठी खुप मोठा संघर्ष केलेला असतो.
स्वता:चे स्थान त्यांनी आपल्या कर्तृत्वाने निर्माण केले आहे.नशीबापेक्षा आपल्या कर्तृत्वावर  अधिक विश्वास असला पाहिजे.प्रत्येकाच्या जीवनात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळत असते.फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे.कर्तूत्वान माणसे संकटाला कधी भित नाही.कारण त्यांच्यात अथक मेहनत घेण्याची क्षमता अधिक असते.कारण ते सबबी कधीच सांगत नाही.हाती घेतलेल्या कामात ते स्वता:ला झोकून देतात.त्यामुळेच ते कर्तृत्ववान होत असतात.
आपले कोणतेही क्षेत्र असो त्यासाठी प्रामाणिकपणे आपले कर्तृत्व दाखवले पाहिजे.नशीबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही.मनात जे असतं ते नशीबात कधीच नसतं नशीबावर विसंबून राहण्यापेक्षा आपले कर्तृत्व दाखवणे कधीही चांगले.जी माणसं कर्तृत्वाने मोठे झाले आज त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.आपण स्वता:ला कधीच कमी समजता कामा नये.आपल्या विचाराने आणि कर्तृत्वाने मोठे व्हा.आपली परीस्थिती कशीही असु देत जर आपले कर्तृत्व चांगले असेल तर जीवनात कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ .त्यासाठी स्वताच्या पायावर कर्तृत्वाने मोठे होता आले पाहिजे.!
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी ,ता.श्रीगोंदा , जिल्हा, अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.