सोमवारपासून कॉग्रेसचे जत‌ तालुक्यात चक्री आंदोलन | २४,२५,२६ जूलै रोजी वेगवेगळ्या गावात कॉग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार

0

जत : जत तालुका काँग्रेस कमिटीचा वतीने दि. २४, २५, २६ जुलै २०२३ रोजी विविध मागण्यासाठी चक्री आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनांची सोमवार पासून संख येथून सुरूवात होणार आहे. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहिर करावा म्हणून सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनांची तीव्रता वाढविण्यात येत आहे.जत तालुका दुष्काळ जाहीर करावा.पिण्याच्या पाण्याचे टँकर त्वरीत सुरू करावेत.जनावरांचा चारा त्वरित उपलब्ध करून द्यावा.म्हैशाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे.

 

 

विस्तारीत म्हैशाळ योजनेचे काम त्वरित सुरू करावे.महाराष्ट्र कर्नाटक करार करून जत पूर्व भागास तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी द्यावे,महावितरणच्या उपकेंद्राची संख्या वाढवावी.त्यासाठी निधी मंजूर करावा.जत तालुक्याचे त्रिभाजन त्वरीत करावे.महाराष्ट्र शासनास हे काही होणार नसेल तर आम्हास कर्नाटक मध्ये जाण्यास परवानगी द्यावी.अशा मागण्या या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात येणार आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.