एल के पी मल्टिस्टेटचा सांगली जिल्हाभर विस्तार | जिल्ह्यात तब्बल १० शाखा कार्यरत

0
सांगली : संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र घेऊन 43 शाखांच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेत तत्पर असलेली एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर या संस्थेच्या सांगली शहर येथील शाखेचा लोकार्पण सोहळा दिमाखात व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.जिल्ह्यात आता एलकेपीने मोठ्या प्रमाणात विस्तार केला अजून व्यवसायिकांची अर्थ वाहिनी ठरलेल्या एलकेपी मल्टिस्टेटने सांगली संपुर्ण जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी पाऊल उचलले आहे.२०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल करणारी हि संस्था जिल्ह्यात अग्रस्थान पटकावेल,अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

 

 

दिवसभर पाऊसाची संततधार सुरू असतानाही लोकार्पण सोहळ्याकरिता शहरांमधील नागरिक, छोटे-मोठे व्यावसायिक,व्यापारी वर्ग व विविध क्षेत्रांमधील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होये. कापूर अग्रणी उद्योग समूहाचे संस्थापक विनायक पाटील,तासगाव अर्बन बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे, ब्रम्हा उद्योग समूहाचे चेअरमन मारुती माळी, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे,जाफर मुजावर,  उपनगराध्यक्ष अमोल कुत्ते, शितल वस्त्र निकेतनचे सचिन माळी,अग्रणी दूध संघाचे पोपटराव बिले, मार्केट कमिटीचे संचालक कुमार शेटे, तासगाव अर्बनचे संचालक उदय वाटकर, राजेंद्र माळी,अभिषेक देशिंगकर, सचिन धोत्रे, वैभव माने,प्रतीक चव्हाण, सिद्धिविनायक इंटरप्राईजेसचे महेंद्रसिंग,धैर्यशील पाटील, सय्यद साहेब,मिलिंद पवार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 

सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गत तेरा वर्षापासून सूर्योदय नावाचा एक उद्योग समूह कार्यरत असून कृषी, उद्योग, कापड, दुध, शिक्षण यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये हा समूह उल्लेखनीय कार्य करत आहे. याद्वारे शेकडो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध झालेले आहे.एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन व सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले, डॉ.बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी हे चार तरुण सन 2010 सालापासून या समुहाच्या माध्यमातून अखंड कार्यरत आहेत.याच उद्योग समूहाने एल के पी मल्टीस्टेटच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रामध्ये क्रांतिकारी पाऊल टाकलेले आहे.

 

 

Rate Card
छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी दोन लाखापर्यंतची झटपट कर्ज योजना या संस्थेच्या वतीने कार्यान्वित असून आरटीजीएस, एनईएफटी व आय एम पी एस यासारख्या सेवा ग्राहकांना मोफत देण्यात येत आहेत. आपल्या प्रास्ताविकामध्ये एल के पी चे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी संस्थेच्या वतीने देऊ करण्यात आलेल्या ठेवीच्या विविध योजनांची माहिती सांगितली.एकविसाव्या शाखेचा लोकार्पण सोहळा आज संपन्न करत असताना सर्व समाधानी ग्राहकांच्या सहकार्याने 165 कोटीहून अधिक व्यवसाय आम्ही करू शकलो,याबद्दल आभार व्यक्त केले.

 

उद्योजक मारुती माळी म्हणाले,आजच्या तरुणांनी या ग्रुपचा आदर्श घ्यावा असे सांगत अनेक वैविध्यपूर्ण दाखले देत उपस्थिततांना मंत्रमुग्ध केले. अनेक मान्यवरांनी यावेळी बोलताना अनिलभाऊ इंगवले व त्यांच्या औद्योगिक मित्र परिवाराच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.