जत मार्केट यार्डमध्ये एकाची गळपासाने आत्महत्या
जत : जत येथील तरूणांनी गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली आहे.पल्हाद उर्फ पल्लू महादेव सुतार (वय ३१)असे मयत तरूणांचे नाव आहे.अधिक माहिती अशी, पल्हाद सुतार हा सुतार काम करतो.जत शहरातील शिवानुभव मंडप येथे त्यांचे घर आहे. सध्या त्यांची पत्नी विजापूर येथे माहेरी गेली होती.सुतारही बरेच दिवस विजापूर येथे राहत होता.दोन दिवसापुर्वी तो जत येथे आला होता.शनिवारी तो घरात विजापूरला जातो म्हणून सांगून घरातून गेला होता.
रवीवारी सकाळी त्यांचा जत मार्केट कमिटीतील डांळीब मार्केटजवळच्या पत्र्याच्या शेडला लटकलेला मृत्तदेह आढळून आला. सुतार यांने शहरातील काही खाजगी सावकारांकडून कर्जे काढल्याची चर्चा घटनास्थळी होती.त्यातून त्यांनी आत्महत्या केली की अन्य काय कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.